Bhausaheb Andhalkar | सहा हजार कोटी पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले, प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

Bhausaheb Andhalkar | साडे सहा हजार कोटी रुपये पंतप्रधान कार्यालयाने वसूल केले आहेत. मी स्वतःचे काहीच बोलत नाही. त्यांनी मला अटक करावी, असे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उस्मानाबाद येथे दिले. ते वंचित बहुजन आघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील उमेदवार भाऊसाहेब आंधळकर (Bhausaheb Andhalkar) यांच्या प्रचार सभेत बोलत होते.

१९८० पासून ते २०२४ अशा काळात इंदिरा गांधी ते मोदी असे सगळे पंतप्रधान पाहिले. यामध्ये पंतप्रधानाचे कार्यालय हे मानवतेचे कार्यालय आणि लोकांना न्याय देणारे भीतीमुक्त कार्यालय असा कारभार मी पाहत आलो आहे. मागच्या 10 वर्षांत मानवतेचा कार्यकाळ राहिला नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोघांना भिडवण्याचे षडयंत्र येथे झाले. पण वंचित बहुजन आघाडीने शांततेची भूमिका घेतल्याने सलोखा कायम राहिला आहे. इथे एकही वर्ग नाही जो म्हणेल तो सुखाने आणि शांतीने राहत आहे. दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी काय म्हणत होते. दर जूनमध्ये हमीभाव जाहीर करता पण हमीभाव शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून ते शेतकरी लाखोंच्या संख्येने हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये दिल्लीत आंदोलनाला बसले होते.

तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल, तर भाऊसाहेब आंधळकर यांना मतदान द्या आणि स्वातंत्र्य गमवायचे असेल, तर भाजपला मतदान द्या. असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?