Flipkart Grocery | फ्लिपकार्ट ग्रोसरीने नोंदवली १.६ पट वार्षिक वाढ ; ५० टक्के ग्रोसरी डिलिव्हरी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून.

– फ्लिपकार्ट ग्रोसरी (Flipkart Grocery) वर दुसऱ्या दिवशी वस्तुंचे वितरण (डिलिव्हरी) मिळते. ही सेवा बंगलोर, चेन्नई, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली यासकट २०० शहरात उपलब्ध आहे. अनंतपूर, बऱ्हामपूर, गोरखपूर, मोरादाबाद, नागाव, सहर्सा, शिमोगा, वेल्लोर अशा टिअर २ शहरातही उपलब्ध आहे.
– विविध ऑफर्स, ग्राहकांच्या सोयीनुसार डिलिव्हरीचे स्लॉट्स, विविध किराणामालाची निवड, यामुळे व्यवसायाच्या वाढीला मदत झाली.
– यापैकी ५० टक्के डिलिव्हरीज इलेक्ट्रिक वाहनांद्वारे करण्यात आल्या आणि १४० टक्के वार्षिक वाढ नोंदवण्यात आली.
– स्थानिक तंत्रज्ञानाच्या मदतीने फ्लिपकार्टने अधिक मागणी असलेले परिसर शोधण्यात भारतभर पसरलेल्या ग्राहकांना सेवा देण्यात यशस्वी झाला आहे.
– यामध्ये तेल, तूप, कणीक, पाकिटबंद पदार्थ, तसेच चहा, कॉफी, साबण, पर्सनल केअर अशा उत्पादनांचा समावेश आहे.

बंगळुरू मे २१- फ्लिपकार्टने त्यांच्या ग्रोसरी व्यवसायात 1.6 पटीने वार्षिक वाढ नोंदवली आहे. ग्राहकांना विविध वस्तूंची निवड करून उत्तम ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव मिळावा या फ्लिपकार्टच्या कटिबद्धतेचे हे द्योतक आहे.

मूल्यवर्धित आणि ग्राहककेंद्रित वाढ
फ्लिपकार्टने ग्राहकांना कायमच प्रथम प्रधान्य दिलं आहे. फ्लिपकार्ट ग्रोसरीमुळे ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये ताजे उत्पादनं मिळतात. ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक उत्पादनावर मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपायरी डेट असते. यामुळे पारदर्शकता आणि विश्वास वाढतो. व्यवसायाच्या विस्ताराचा भाग म्हणून फ्लिपकार्ट बंगलोर, चेन्नई, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली यासारख्या महानगरात तर आहेच पण भारतातील औरंगाबाद, बंकुरा बोकारो, छत्तरपूर, गुवाहाटी, जमशेदपूर, कृष्णा नगर आणि विशाखापट्टणम यासारख्या शहरात सुद्धा फ्लिपकार्टची सेवा लोकप्रिय झाली आहे.

फ्लिपकार्ट जलदसेवेचे जनक आहेत. फ्लिपकार्ट ग्रोसरी ही एकमेव ई-कॉमर्स कंपनी आहे जी दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी देते. ही सेवा २०० शहरात उपलब्ध आहे. त्यात बंगलोर, चेन्नई, कोलकाता, मुंबई या महानगरांचा समावेश तर आहेच पण त्याबरोबर अनंतपूर बऱ्हमपोर, गोरखपूर, मोरादाबाद, नागाव, सहरसा, शिमोगा, वेल्लोर, यासारख्या शहरात देखील उपलब्ध आहे. अगदी पाच रुपयांपासून सुरुवात होणारे विविध उत्पादन या शहरातील लोक मागवू शकतात. त्यामुळे ग्राहकांना परवडतील अशी उत्पादन देण्याकडे फ्लिपकार्टचा कल दिसून येतो. तसंच ई-ग्रॉसरी शॉपिंग साठी फ्लिपकार्ट ग्रोसरी त्यांचा पाया अधिक बळकट करत आहे.

सातत्याने प्रगती करत असलेल्या क्षेत्रांचा विचार केला असता फ्लिपकार्टने तेल, तूप, कणीक, चहा, कॉफी, साबण, पर्सनल केअर यासारख्या उत्पादनात १.६ पटीची वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्याचबरोबर गरजेच्या आणि खूप गरजेच्या नसलेल्या वस्तूंमध्येही उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. तसंच प्रीमियम कॅटेगिरी मध्ये उदाहरणार्थ लिक्विड डिटर्जंट मध्ये १.८ पट, ड्रायफ्रूट्स मध्ये १.५ पट आणि एनर्जी ड्रिंक मध्ये १.५ पट इतकी वाढ नोंदवली गेली आहे.

वाढत्या मागणीसाठी पायाभूत सुविधांचा विस्तार
दैनंदिन गरजेच्या वस्तूंची वाढती मागणी पाहता फ्लिपकार्ट ने त्यांच्या सप्लाय चेन क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये विस्तार केला आहे आणि देशभरात ११ ग्रोसरी फुलफिलमेंट सेंटर्स उघडले आहेत. अहमदाबाद, भुवनेश्वर, चेन्नई, हुबळी, हैदराबाद, कोलकाता, लुधियाना, मालदा पाटणा, दिल्ली एनसीआरमधील सोनीपत, विशाखापट्टणम या शहरात हे सेंटर उघडले आहेत. हे सेंटर १२.१४ लाख चौरस फूट इतक्या भागात विस्तारले असून २०.९ लाख युनिट इतक्या वस्तू साठवण्याची क्षमता तिथे आहे. तसंच ते १.६ लाख ग्रोसरी ऑर्डर या भागात पूर्ण करतात. वितरणाचे उत्तम जाळे निर्माण करणे हा फ्लिपकार्टच्या वाढीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे देशातील ग्राहकांना ऑनलाइन शॉपिंग करणे अधिक सोयीचे होते.

तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वोत्कृष्टतेचा ध्यास
देशातच विकसित केलेल्या तंत्रज्ञानामुळे फ्लिपकार्ट ने ऑनलाइन ग्रोसरी ची वाढती मागणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. झिरो इंटरेस्ट क्रेडिट अँड ओपन बॉक्स डिलिव्हरी ही यातील महत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. यामुळे ग्राहकांचा ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव अधिकाधिक समृद्ध व्हावा ही फ्लिपकार्टची कटिबद्धता यातून दिसून येते. कंपनीची तंत्रज्ञान टीम योग्य दर ऑफर करण्यासाठी माहिती गोळा करते. तसंच कस्टमर हब ओळखते. डिलिव्हरीचं रियल टाईम मॉनिटरिंग करते आणि त्यामुळे ई-कॉमर्सच्या क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे

शाश्वत विकासावर भर
फ्लिपकार्टचा कायमच शाश्वत विकासावर भर आहे त्यामुळे पर्यावरणाप्रति असलेल्या जबाबदारीतही फ्लिपकार्ट ने मोठी झेप घेतली आहे. सध्या ५०% डिलिव्हरी या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करून होतात. त्यात वर्षभरात १४० टक्क्यांची वाढ झाली आहे. न्यू दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि तामिळनाडू या राज्यांनी यात आघाडी घेतली आहे. हरित भविष्य उभारण्यासाठी फ्लिपकार्ट कायमच आग्रही आहे. फ्लिपकार्ट ग्राहकांना पुनर्वापर करता येईल अशा पिशव्यांमध्ये आणि पर्यावरण पूरक खोक्यांमध्ये डिलिव्हरी करते. यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होते आणि पर्यावरणावर त्याचा फारसा दुष्परिणाम होत नाही.

फ्लिपकार्टच्या ग्रोसरी (Flipkart Grocery) विभागाचे प्रमुख आणि उपाध्यक्ष हरिकुमार जी म्हणाले, “फ्लिपकार्टच्या ग्रोसरी विभागातील नवनवीन तंत्रज्ञान नवीन विकसित होत असलेल्या विभागातील ग्राहकांवर भर ग्राहकांना योग्य दरात किराणामाल पोचवणं या गोष्टी फ्लिपकार्टच्या या वाढीमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आम्ही आमच्या व्यवसायाचा विस्तार करतोय आणि आमच्या सेवेचा दर्जा वाढवतो आहे हे करत असताना भारतातील लाखो ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार सेवा देण्यास कटिबद्ध आहोत.

फ्लिपकार्ट मध्ये आम्ही डिजिटल ग्रोसरी (Flipkart Grocery) भागात नवनवे आयाम प्रस्थापित करणार आहोत. जेणेकरून फ्लिपकार्ट ला लोक प्राधान्य देतील आणि ग्रोसरी देशभरात सर्व ग्राहकांना उपलब्ध होईल यावर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत. ग्राहकांना प्राधान्य आणि उत्तम टीम यामुळे आम्ही भारतातील ऑनलाईन क्रॉसरी शॉपिंग क्षेत्रात नक्कीच क्रांती घडवून आणू.”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप