पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची नुकतीच दिवसाढवळ्या हत्या (Murder of Kishore Aware) करण्यात आली होती. या प्रकरणामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी नगरसेवक भानू खळदे (Bhanu Khalde) याला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुंडा स्कॉड पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक तपासात भानू खळदे याचा मुलगा गौरव खळदे याचा खुनात सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे चौकशी केली होती. यावेळी सदर गुन्ह्याच्या कटकारस्थानात भानू खळदे याचा सहभाग असल्याची माहिती पुढे आली होती. मात्र भानूच्या अटकेनं खऱ्या अर्थानं या खुनाचे गुड उकलणार आहे.