Saif Ali Khan | नशेत आहे तो… सैफ अली खानचा मुलगा पडता-पडता वाचला, व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानचा (Saif Ali Khan) मुलगा इब्राहिम अली खान याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो नशेत असल्याचे दिसून चालताना त्याची पावले डगमगताना दिसत आहेत. इब्राहिम अली खान काही ठिकाणाहून बाहेर पडत असताना त्याचा पाय चुकीच्या जागी पडला आणि तो अडखळला. त्यानंतर अभिनेता बाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना ‘सॉरी-सॉरी’ म्हणतो आणि पुढे सरकतो. त्याचे लाल डोळे पाहून लोकांनी सोशल मीडियावर विविध प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत. कोणीतरी लिहिलं आहे की तो बरा होईल अशी आशा आहे, तर कोणी म्हटलं आहे की तो नशेत आहे.

इब्राहिम अली खान याच्याबद्दल सांगायचं झालं तर, इब्राहिम याने अद्याप अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही. पण तरी देखील इब्राहिम याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. इब्राहिम सध्या पडद्याच्या मागे राहून काम करत आहे. चाहते देखील इब्राहिम याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.(Saif Ali Khan)

इब्राहिम अली खान सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवर इब्राहिम याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहाण्यासाठी इब्राहिम कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतोय चाहते देखील त्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like