husband-wife Relation | पती-पत्नीमधील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी बेडरूममध्ये करावे हे काम

पती आणि पत्नी यांचं नातं (husband-wife Relation) अतूट असतं. लग्नमंडपात सात फेरे घेताना पती पत्नी सात जन्म एकमेकांसोबत राहण्याची वचने घेतात. परंतु बऱ्याचदा दोघांमध्ये छोट्या मोठ्या कारणामुळे नोकझोक झालेली पाहायला मिळते. हे छोटे-मोठे मतभेद पती पत्नीने मिळूनच सोडवले तर बरे असते. कारण दोघांत तिसरा पडला की वाद कमी व्हायचे सोडून वाढू लागतात. त्यामुळे मी श्वेता या व्हिडिओत तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे, ज्याद्वारे नवरा-बायकोतील प्रेम दीर्घ काळासाटी टिकून राहील. चला तर मग सुरुवात करुया.

पती-पत्नीचा बेडरूम (husband-wife Relation) म्हणजे दोघांचा निवांत क्षण एकत्र घालविण्याचा एक चांगला स्पॉट असतो. त्यामुळे बेडरूममध्ये एकांतात फक्त एकमेकांविषयीच चर्चा करावी. कोणत्याही तिसºया व्यक्तीशी संबंधित चर्चा करू नये. एकांतामध्ये पती-पत्नीने स्वत:विषयी चर्चा केल्यास वाद होत नाही आणि जवळीकता, प्रेम वाढण्यास मदत होते.

पती किंवा पत्नीने आपल्या पार्टनरकडून भूतकाळात एखादी चूक झाली असेल तर यावेळी ही चर्चा शक्यतो टाळावी. त्या चुकीची वारंवार जाणीव करून देऊ नका. अशावेळी झालेल्या गोष्टींवर चर्चा करीत बसल्यास वाद आणि दु:खच पदरी पडते. यामुळे जुन्या चुकांवर जास्त चर्चा करत न बसता, भविष्याबद्दल बोला.

सुखी वैवाहिक जीवनासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला जोडीदार चिडचिड करत असेल, रागवत असेल तर त्यावेळी दुसऱ्याने शांत राहावे. जर पती-पत्नी दोघेही एकाच वेळी रागाने भांडू लागले, तर परिस्थिती सुधरण्याऐवजी बिघडत जाते. रागामध्ये मनुष्याची विचार करण्याची क्षमता नष्ट होते आणि व्यक्ती योग्य-अयोग्य गोष्टीची निवड करू शकत नाही. यामुळे सर्वात पहिले रागात आलेल्या जोडीदाराला शांत करण्याचा प्रयत्न करावा.

सर्वांनाच माहिती आहे की स्वत:चे कौतुक ऐकायला प्रत्येकला आवडते, विशेषत: कौतुक जोडीदार करत असेल तर जास्त आनंद होतो. पती-पत्नी दोघांनीही दररोज दिवसातून कमीत कमी एक चांगली गोष्ट एकमेकांबद्दल बोलावी. थोड्याच दिवसांमध्ये याचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल आणि प्रेम वाढेल.

अनेकदा काही लोक आॅफिसचा तणाव घरात घेऊन येतात. आॅफिसमध्ये बॉस किंवा इतर कर्मचारीसोबत झालेला वाद किंवा कामातील अपयशाबद्दल सांगून पत्नीवर चिडचिड करतात. अशावेळी पत्नीने पतीचा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा. तणावाचे कारण लक्षात घेऊन, तो दूर करण्याचा मार्ग दाखवावा. ही गोष्ट वैवाहिक जीवनात सुख-शांती तसेच प्रेम वाढवेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप