Lok Sabha Election Results : प्राथमिक कलांमध्ये ‘या’ मतदारसंघात आहे महाविकास आघाडीचा बोलबाला

Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates: – राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील 1 लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणपणे निकालाचे कल लक्षात येणार आहेत. तर रात्री आठ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.

दरम्यान, सोलापूरमधून प्रणिती शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. महायुतीचे राम सातपुते पिछाडीवर पडले आहेत. माढामधून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत. सिंधूदूर्ग-रत्नागिरीमधून नारायण राणे आघाडीवर असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे टपाली मतांमध्ये आघाडीवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.बारामतीमधून पाहिला कल हाती आला असून पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या मात्र आता सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उत्तर मुंबई मतदारसंघातून पियूष गोयल आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप