Chandrayaan 3: ‘उस चांद के मिट्टी पर हमारे….!’ अमिताभ यांची कविता वाचून येईल डोळ्यात पाणी!

भारताच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेच्या चांद्रयान 3 च्या (Chandrayaan 3) यशस्वी लँडिंगसाठी, देशभरातून प्रार्थना केल्या जात आहेत. चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगसाठी देशाच्या बहुतांश भागात पूजा आणि हवन केले जात आहेत. चांद्रयान-३ आज संध्याकाळी ६.४० वाजता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. चांद्रयान उतरताच असे करणारा भारत हा जगातील एकमेव देश बनेल. कारण याआधी कोणत्याही देशाचा रोव्हर येथे उतरलेला नाही. दरम्यान बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी तर खास कविता करत इस्त्रो च्या शास्त्रज्ञांचा उत्साह वाढवला आहे.

अमिताभ बच्चन हे आपल्या कवितेमध्ये म्हणतात की, भारताचं पाऊल आता चंद्रावर पडेल.. त्या चंद्राच्या मातीवर पहिलं पाऊल भारताचं असेल…..खऱ्या अर्थानं चांद्रयान आपल्या मामाच्या घरी पोहचणार आहे….आपल्या बालपणात सोबत करणारा चंद्र, प्रेमिकेचा लाडका चंद्र, व्रत वैकल्यं यांच्यासाठी महत्वाचा असणारा चंद्र हे सगळं आता आपल्यासाठी आणखी जवळ येणार आहे….याचं कारण म्हणजे आपण चंद्रावर जाणार आहोत…