योगींच्या राजवटीत दलित सुरक्षित नाहीत; हाच सबका साथ सबका विकास आहे का?

मुंबई – उत्तरप्रदेशमधील पवटी ( मुझफ्फरनगर ) गावात दलितांनी शेतात गेल्यास जोड्याने मारण्याची आणि ५ हजार रुपयांचा दंड व कूपनलिकेजवळ येण्याचे धाडस केल्यास त्यांना इतर गंभीर परिणामांची घोषणा केल्याची घटना समोर आली आहे.या पार्श्वभूमीवर भाजप सत्तेत आल्यापासून भारतात दलित अत्याचारात वाढ होत असून हाच सबका साथ आणि सबका विकास आहे का,? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (NCP State Chief Spokesperson Mahesh Tapase) यांनी केला.

भाजपशासित राज्यांमध्ये दलित सुरक्षित नाहीत, त्यामुळे पंतप्रधान मोदींनी देशातील दलितांच्या सुरक्षेची वैयक्तिक खात्री द्यावी, अशी मागणी महेश तपासे यांनी केली आहे. दरम्यान अशा घटना घडू नये यासाठी देशभर ग्रामसभा घेऊन इतर समाजाला मागासवर्गीयांसाठी संवेदनशील करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असेही महेश तपासे म्हणाले.