Loksabha Election Results 2024 | अमेठीत भाजपाचे ग्रह फिरले! स्मृती इराणी १० हजारांपेक्षा जास्त मतांनी मागे

Loksabha Election Results 2024 Live | लोकसभा निवडणुकीचा निकाल आज स्पष्ट होणार असून देशात एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत होत आहे. लोकसभेच्या एकूण ५४३ जागांपैकी एनडीएच्या खात्यात सध्या ३१५ जागा आहेत, तर इंडिया आघाडीही २०७ जागांवर आहे. मात्र भाजपाला अमेठी लोकसभा मतदारसंघातून मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

अमेठी येथून भाजपाने स्मृती इराणी (Smriti Irani) यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र १०४२३ मतांनी स्मृती इराणी पिछाडीवर (Loksabha Election Results 2024 ) आहेत. स्मृती इराणी यांच्या खात्यात सध्या २४८५९ मते आहेत. दुसरीकडे इराणींचे विरोधक आणि काँग्रेसचे उमेदवार किशोरी लाल यांना ३५२८२ मते पडलेली दिसत आहेत. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा फटका असू शकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप