पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा!

vanchit bahujan aghadi meeting : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (prakash ambedkar) यांनी पॅलेस्टाईन – इस्राईल मुद्द्यावर (israel-palestine War) मुंबईत वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी आणि धर्मगुरूंनी एकत्र येत शांती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. ही सभा ८ डिसेंबर रोजी मुंबईत होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

पुणे येथील महात्मा फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले व महात्मा फुले वाड्याची पाहणी ही केली. यावेळी त्यांची पत्रकार परिषद पार पडली.

इस्राईल – पॅलेस्टाईन युद्धाची व्याप्ती वाढली तर याचा भारतावर परिणाम होईल, आखाती देशात ५ कोटींच्यावर भारतीय लोक राहतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारला ओझं उचलावचं लागेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. आंतरराष्ट्रीय मुद्द्याकडे धर्माच्या चष्यम्यातून न पाहता सर्वधर्मियांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकरांनी केले आहे.

सध्या राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून संघर्ष होताना दिसत आहे. यावर ॲड. प्रकाश आंबेडकरांनी म्हटले की, ज्यांचा ओबीसीच्या लढ्याशी संबंध नाही असे लोक काहीही वक्तव्य करून राज्यात दंगल कशी होईल अशी परिस्थिती निर्माण करू पाहत आहेत. यावर ओबीसींना सतर्क राहण्याचे आवाहन ही त्यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर सरकार कोणाचं येईल ते सांगता येणार नाही मात्र, या देशाचे पुढचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नसतील एवढं मी खात्रीने सांगतो अस भाकितही ॲड. आंबेडकरांनी व्यक्त केले.

छगन भुजबळांना जेलबाहेर काढणारा मी –
यावेळी बोलताना त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला आहे. भुजबळ हे मंडल कमिशनच्या विरोधात होते. छगन भुजबळांना जेलमधून बाहेर काढणारा मीच आहे. मी न्यायाधिशाला फटकारले नसते तर, छगन भुजबळ जेलच्या बाहेर आले नसते. पण भुजबळांनी कधी आभार मानले नाहीत असे त्यांनी सांगितले. आंबेडकरवाद – फुलेवाद – शाहुवाद याला कोणा व्यक्तीची गरज नाही. या विचारात खूप ताकद असल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यात कधीही दंगली घडू शकतात, स्थानिक पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना आहेत अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. संविधान कोणीही बदलणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र हे मोहन भागवतांचे वक्तव्य आहे का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत –
जरांगेंनी मध्यंतरी एक वक्तव्य केले होते. त्यातील शब्द ॲड. आंबेडकरांच्या सल्ल्यामुळे त्यांनी मागे घेतले. या त्यांच्या भूमिकेचे ॲड. आंबेडकरांनी स्वागत केले आहे.

ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीला पाठिंबा –
ओबीसी समजाचे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन करत आहेत. त्या विद्यार्थी आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा