कॉंग्रेस नेत्या अलका लांबाच्या अडचणी वाढल्या;  एसआयटीसमोर हजर राहण्यासाठी पोलिसांची नोटीस   

  

नवी दिल्ली-  पंजाब पोलिस (Punjab Police) बुधवारी अॅक्शन मोडमध्ये दिसले. आम आदमी पार्टीचे (आप) माजी नेते आणि कवी कुमार विश्वास (Poet Kumar Vishwas) यांच्यानंतर पंजाब पोलिस आपच्या माजी आमदार आणि काँग्रेस नेत्या अलका लांबा (Congress leader Alka Lamba) यांच्या घरी पोहोचले. पंजाब विधानसभा निवडणुकीदरम्यान आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) यांच्याविरुद्ध केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी अलका लांबा यांना 26 एप्रिल रोजी सरद रूपनगर पोलिस ठाण्यात(sarad rupnagar police station) विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) हजर राहण्यासाठी नोटीस दिली आहे.

नोटीस मिळाल्यानंतर अलका लांबा यांनी ट्विटरवर सांगितले की, पंजाबमधील आप सरकारच्या धमकीला आपण घाबरत नाही. अलका लांबा यांनी ट्विट( tweet) केले की, पंजाब पोलिसांनी घराच्या भिंतीवर नोटीस चिकटवली आणि भगवंत मान ( Bhagvant Mann) यांच्या नेतृत्वाखालील आप सरकारच्या वतीने धमकी दिली की मी 26 एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात हजर न झाल्यास परिणाम वाईट होतील.

यापूर्वी, आपचे माजी नेते कुमार विश्वास यांना पंजाब पोलिसांच्या वतीने अशीच नोटीस बजावण्यात आली होती. पंजाब पोलिसांनी आज रूपनगर शहरात कुमार विश्वास यांच्याविरुद्ध 20 फेब्रुवारीच्या राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी   एफआयआर (FIR) नोंदवला आहे. आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांनी आरोप केला होता की केजरीवाल यांचे पंजाबमधील फुटीरतावाद्यांशी संबंध आहेत आणि गेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान फुटीरतावाद्यांबद्दल सहानुभूती असलेले लोक त्यांच्या घरी भेटी घेत असत