Narendra Modi | “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी यांचा काँग्रेसमध्ये विलीन होणं पक्क, पंतप्रधान मोदींचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आपल्या प्रचार सभांदरम्यान ते सातत्याने शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटावर टीकास्त्र सोडत आहेत. दरम्यान भाजपच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भारती पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज दिंडोरीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकरे गट जेव्हा काँग्रेसमध्ये विलीन होईल, तेव्हा मला बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येईल. त्यांना खूप दु:ख होईल, असा दावा केला आहे.

“नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी यांचा काँग्रेसमध्ये विलीन होणं पक्क आहे. जेव्हा या नकली शिवसेनेचं काँग्रेसमध्ये विलीन होणार तेव्हा मला सर्वात जास्त आठवण बाळासाहेब ठाकरे यांची येईल. कारण बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, ज्यादिवशी शिवसेना ही काँग्रेस होत आहे असं वाटेल त्यादिवशी शिवसेना संपवून टाकेल. याचा अर्थ नकली शिवसेनेचा पत्ता राहणार नाही. हा विनाश बाळासाहेब ठाकरे यांना सर्वाधिक दु:खी करत असेल”, अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

पंतप्रधान मोदी (Narendra Modi) म्हणाले, “एनडी आघाडीला केवढं मोठं यश येत आहे याची जाणीव त्यांच्या एका बड्या नेत्याच्या वक्तव्यातून माहिती पडतं. एनडी आघाडीचा मुख्य पक्ष हा काँग्रेस आहे. काँग्रेस इतक्या वाईट पद्धतीने हारत आहे की, त्यांच्यासाठी विरोधी पक्ष होणं देखील कठीण आहे. त्यामुळे इथले जे नेता आहेत, एनडी आघाडीचे, त्यांनी सर्व छोट्या पक्षांना सल्ला दिलाय की, निवडणूक समाप्त झाल्यानंतर या सर्व छोट्या पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं. याचा अर्थ आपापले दुकानं बंद करायला पाहिजे. कारण त्यांना वाटतं कारण हे सर्व दुकानं एकत्र झाले तर कदाचित ते विरोधी पक्ष बनतील. त्यांची ही परिस्थिती आहे”, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like