Pandit Laxmikant Dixit | राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेतील मुख्य पुजारी असलेले पंडित लक्ष्मीकांत दीक्षित यांचे निधन

अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठाचे प्रमुख आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित (Pandit Laxmikant Dixit) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. आचार्य गेल्या काही दिवसांपासून गंभीर आजाराने ग्रासले होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात लक्ष्मीकांत यांचा पुजाऱ्यांच्या संघात समावेश होता. राममंदिराच्या अभिषेकात त्यांनी 121 पुरोहितांचे नेतृत्व केले होते.

प्राणप्रतिष्ठेत प्रमुख अर्चक म्हणून सहभागी असलेले लक्ष्मीकांत दीक्षित (Pandit Laxmikant Dixit) यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपासून काशी येथे वास्तव्यास आहे. मूळचे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जेऊरचे, लक्ष्मीकांत दीक्षित यांचे कुटुंब अनेक पिढ्यांपूर्वी काशी येथे स्थायिक झाले. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या पूर्वजांनीही नागपूर आणि नाशिक या संस्थानांत धार्मिक विधी केले. लक्ष्मीकांत दीक्षित यांचे पुत्र सुनील दीक्षित यांनी सांगितले की, त्यांच्या पूर्वजांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला होता.

तसेच लक्ष्मीकांत दिक्षीत वाराणसीच्या मीरघाट येथे असलेल्या सांगवेद महाविद्यालयाचे वरिष्ठ शिक्षक होते. या विद्यापीठाची स्थापना काशीच्या राजाच्या सहकार्याने झाली. आचार्य लक्ष्मीकांत यांची काशीतील यजुर्वेदाच्या महान विद्वानांमध्ये गणना होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप