Dr. Dilip Deshmukh | ध्येय प्राप्तीसाठी मेहनत घ्या, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल; डॉ. दिलीप देशमुख यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन

Dr. Dilip Deshmukh | “अभ्यास हे एक शास्त्र असून त्यासाठी वेगळी पद्धती अवलंबल्यास विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. अभ्यासासोबत अवांतर वाचन केल्यास भविष्यात निश्चितच फायदा होईल. माहितीचे रुपांतर ज्ञानात करणे आवश्यक असून जेवढ्या शंका मनात येतील त्या सर्व शिक्षकांना विचारा. ध्येय प्राप्तीसाठी मेहनत घ्या, तुम्ही यशस्वी नक्की व्हाल.” असं प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ दिलीप देशमुख म्हणाले आहेत. कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात डॉ देशमुख (Dr. Dilip Deshmukh) बोलत होते.

शैक्षणिक वर्ष इयत्ता दहावीला अत्यंत महत्त्व आहे. दहावीला गेल्यानंतर विद्यार्थी हे तणावात असतातच मात्र त्यांच्यासोबत पालक देखील तणावात येतात. शैक्षणिक क्षेत्रात वाढत असलेल्या स्पर्धेमुळे विद्यार्थी आणि पालक हे तणावाखाली असल्याचे समोर येत आहे. अभ्यासाचे उत्तम नियोजन कसे करावे? अभ्यास करताना कोणते तंत्र अवलंबिले जावे आणि पालकांनी काय काळजी घ्यावी, यासाठी कसबा विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि भाजपा कसबा विधानसभा यांच्यावतीने मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.

प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ दिलीप देशमुख यांनी दहावीच्या विद्यार्थांना अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत अभ्यासाचे उत्तम नियोजन, अचूक वेळेचे व्यवस्थापन, आणि पध्दतींच्या बाबतीत बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यास पद्धतीत सुधारणा कशी करावी आणि परीक्षेच्या तयारीसाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.

यावेळी बोलताना हेमंत रासने म्हणाले “शिक्षण क्षेत्रामध्ये इयत्ता दहावीचे वर्ष महत्त्वाचे मानले जाते, आपली मुले दहावीला गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह पालक देखील अभ्यासाच्या टेन्शनमुळे तणावाखाली असल्याचं दिसून येतं. हे टाळण्यासाठी काय नियोजन करावे, सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचा तणाव दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या करिअर करिता डॉ. दिलीप देशमुख सरांचे मार्गदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल. कसबा विधानसभा मतदारसंघ आणि परिसरातील विद्यार्थ्यांसाठी यापुढे देखील विविध उपक्रम आयोजित करण्याचा आमचा मानस आहे”

यावेळी कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे, मा. नगरसेवक भारत निजामपूरकर, विष्णू अप्पा हरिहर, प्रतिभा ढमाले, गायत्री खडके, राजेश येनपुरे, विजयालक्ष्मी हरिहर, योगेश समेळ, उज्वलाताई पावटेकर, धनंजय जाधव,सरचिटणीस राणीताई कांबळे, वैशाली नाईक, उमेश चव्हाण, अमित कंक, चंद्रकांत पोटे, प्रशांत सुर्वे, प्रणव गंजीवाले, राजू परदेशी, महिला मोर्चा अध्यक्षा अश्विनीताई पवार, युवा मोर्चा अध्यक्ष निर्मल हरिहर, अनिल बेलकर, उदय लेले, सर्व प्रभाग अध्यक्ष तसेच कसबा मतदारसंघातील सर्व माहिला आघाडी पदाधिकारी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मविआचा पुण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! ठाकरेंना २ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस इतक्या जागा लढणार

Chhagan Bhujbal : इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाला कुठल्याही परिस्थितीत धक्का लागणार नाही, भुजबळ यांची ग्वाही

Pune Accident: पोर्श कार अपघाताची पुनरावृत्ती! पुण्यात आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला उडवले