Pankaja Munde | मी मतांचं नाही विकासाचं राजकारण करते, पंकजाताई मुंडे यांची जनतेला साद

Pankaja Munde | राजकारण करत असताना मी कधी कुणाविषयी अभद्र बोलले नाही की कधी जातीभेद केला नाही. मायनस असणाऱ्या गावांनाही करोडो रूपयांचा निधी दिला. मी मतांचं नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, जिल्हयाच्या विकासाचं बीजारोपण करण्यासाठी मला आपल्या आशीर्वादाची गरज आहे, त्यासाठी मला साथ द्या अशा शब्दांत भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार तथा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी जनतेला साद घातली.

नगरहून प्रस्थान केल्यानंतर बीडच्या वेशीवर धामणगांव इथं पंकजा मुंडे यांचं दुपारी थाटात आगमन झालं. लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांनी मोठया जल्लोषात, मिरवणूक काढून फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जेसीबीतून पुष्पवृष्टी करत त्यांचं जोरदार स्वागत केले. खासदार डाॅ.प्रितमताई मुंडे हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. सत्कारानंतर जनतेशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

भाषणाच्या सुरवातीलाच पंकजाताई म्हणाल्या,उमेदवार बरा आहे का? फॉर्म भरू का? निवडून देणार का? असे प्रश्न समोर उपस्थित असलेल्या नागरिकांना विचारला. मी अशी उमेदवार आहे, ज्याने बायोडेटा बनवला नाही. आमचा विजय निश्चित आहे.
माझं तिकिट राज्याने नाही ठरवलं, देशातील सर्वोच्य नेत्याने ठरवलं आहे. ही जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली असल्याचे त्या म्हणाल्या.

पंकजा, तुला परळी विधानसभा लढायची आहे, असं मुंडे साहेब म्हणाले, त्यांची आज्ञा कधीच खाली पडून दिली नाही. मुंडे साहेबांच्या अकाली निधनानंतर मी राज्यात नसते तर खूप गडबड झाली असती, म्हणूनच मी राज्यात थांबले आणि प्रीतमला केंद्रात पाठवलं. मी पराक्रमी आहे, प्रीतम परिक्रमा करणारी आहे,’ असं पंकजाताई मुंडे म्हणाल्या.

जातीचा विषय का काढला जातो
तिकीट जाहीर झाल्यावर मनात काहुर माजलं. मी बुद्धीने निर्णय घेणार आहे. आमदार-खासदार करणारी नेतेमंडळी सोबत आहेत. २०१९ मध्ये पडल्यावर काही जण पंकजा मुंडे संपली असं म्हणत होते, पण मी संपणार नाही. पंकजा मुंडेंच्या सभेने अनेक जण खासदार होतात, पण निवडणूक आली की मला वाटतं माझ्या जातीचा विषय काढला जातो? माझ्या कामाचा, नितीचा का काढला जात नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

मी सर्व जाती धर्माची माऊली
मी कधीच जातीपातीचा विचार करत नाही. मी सगळ्या जाती धर्माची माऊली आहे, कुठल्या नेत्याची सावली नाही. मराठा समाजाची आरक्षणाची भूमिका योग्यच आहे, पण कदाचित माझ्या माध्यमातून हा विषय पूर्ण होणार असेल, मराठा आरक्षणाचा आक्रोश योग्यच आहे. मी कधीच जातीपातीच्या मंचावर गेले नाही. या सगळ्यांची एकत्र मोट बांधण्याची गरज आहे, ती बीडमधून बांधायची आहे. सगळ्या रंगांना एक करायचं आहे. पोटातून काम करण्याची गरज आहे असं त्या म्हणाल्या. कोणाला तरी या समाजात सौख्य राहून द्यायचं नाही. पण त्यांचा डाव आपल्याला यशस्वी होऊ द्यायचा नाही. मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मी सन्मान करते’, असंही त्यांनी सांगितलं.

‘विनायक मेटेंची शिव संग्राम आजही आमच्यासोबत आहे, मला लोकसभेची चिंता करण्याची गरज नाही. राज्यातील अनेक नेते बीड जिल्ह्यात राजकारण करतात, पण जनता तसं करू देणार नाही. मी मतांचं राजकारण करण्यासाठी नाही तर विकासाचं राजकारण करण्यासाठी राजकारणात आहे, त्यासाठी मला आपले आशीर्वाद आणि साथ हवी आहे असंही पंकजाताई म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज