तुम्हालाही त्याच मातीत गाडणार… औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकणाऱ्या ओवैसींना संजय राऊतांनी फटकारले

मुंबई – काल एमआयएमचे नेते अकबरुद्दीन औवेसी (MIM leader Akbaruddin Owaisi) औरंगाबादच्या दौऱ्यावर  होते . या दौऱ्यादरम्यान त्यांनी  शहरातील धार्मिळ स्थळ आणि दर्ग्यांना भेटी दिल्या. विशेष म्हणजे त्यांनी  स्वराज्याचा शत्रू असणाऱ्या मुगलसम्राट औरंगजेबच्या (Aurangzeb)  कबरीवर फुले वाहिली आणि ते नतमस्तक झाले. (Akbaruddin Owaisi at the tomb of Aurangzeb)

सुरुवातीला त्यांनी एका मस्जिदीत नमाज देखील अदा केली. त्यानंतर खासदार इम्तियाज जलील ( MP Imtiaz Jalil ), एमआयएम नेते वारीस पठाण आणि स्थानिक नेत्यांसह अकबरुद्दीन ओवेसी औरंगजेबाच्या कबरीवर गेले. कबरीवर फुलं वाहून ( Owesani laid flowers at Aurangzeb’s tomb ) पुढच्या कार्यक्रमाला मार्गस्त झाले.

दरम्यान, स्वराज्याच्या शत्रूचे उदात्तीकरण केल्याने ओवेसी आणि त्यांच्या पक्षावर आता टीका होत आहे. यावरुन शिवसेनेसोबतच इतर राजकीय पक्षांनी ओवैसींवर निशाणा साधला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तर थेट ओवैसींना इशाराच दिला आहे. तुम्हालाही त्याच कबरीत गाडणार असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. औरंगजेबाला याच मातीत आम्ही गाडलं होतं. औरंगजेबाचे भक्त आहेत जे राजकारण करत आहेत त्याचीही तिच अवस्था होईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं.

संजय राऊत म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही. संभाजीनगरला वारंवार यायचं आणि औरंगजेबाच्या कबरीपुढे गुडघे टेकायचे. यातून जर महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची असं काही तरी राजकारण ओवैसींचं दिसत आहे. मी इतकंच सांगेन की, त्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्राच्या मातीत मराठ्यांनी बांधली. त्याला कबरीत आम्ही टाकलं. महाराष्ट्रावर चाल करणारा हा मुघल राजा. तुम्ही आज कबरीवर येऊन नमाज पडत आहात… कधीतरी तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल. असं ते म्हणाले.