Jasprit Bumrah | 15 षटकात 3 चौकार आणि 1 षटकार… जसप्रीत बुमराह फलंदाजांसाठी ठरतोय कर्दनकाळ

Jasprit Bumrah | 2024 च्या टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची विजयी मोहीम सुरूच आहे. आयर्लंडशिवाय टीम इंडियाने साखळी टप्प्यातील सामन्यांमध्ये पाकिस्तान आणि अमेरिकेचा पराभव केला. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुपर-8 फेरीची सुरुवात शानदार शैलीत केली. सुपर-8 फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. भारतीय फलंदाजांव्यतिरिक्त गोलंदाजही आपले काम चोख बजावत आहेत, पण या स्पर्धेतील जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) आकडेवारी तुम्हाला माहीत आहे का?

जसप्रीत बुमराहची आकडेवारी आश्चर्यकारक…

खरं तर, या टी20 वर्ल्ड कपमधील जसप्रीत बुमराहचे आकडे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. या स्पर्धेत आतापर्यंत जसप्रीत बुमराहने 15 षटके टाकली आहेत, ज्यामध्ये विरोधी संघाचे फलंदाज केवळ 3 चौकार आणि 1 षटकार मारू शकले आहेत. तसेच जसप्रीत बुमराहने विरोधी संघातील 8 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. जसप्रीत बुमराह ज्या प्रकारे महत्त्वाच्या प्रसंगी भारतासाठी विकेट घेत आहे आणि धावा रोखण्याचे काम करत आहे, त्यावरून तो या स्पर्धेत भारतासाठी मोठा घटक ठरणार आहे, हे स्पष्ट होते.

आज भारतीय संघ सुपर-8 फेरीचा दुसरा सामना खेळणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला बांगलादेशचे आव्हान असेल. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने येणार आहेत. 24 जून रोजी दोन्ही संघ भिडतील. मात्र, आज भारतीय संघ बांगलादेशला हरवून उपांत्य फेरीतील आपला मार्ग सोपा करायचा आहे. सध्या ऑस्ट्रेलिया ग्रुप-1 मध्ये अव्वल आहे. तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे समान 2-2 गुण असले तरी ऑस्ट्रेलियाचा नेट रनरेट चांगला आहे. आज जर भारतीय संघ बांगलादेशला पराभूत करण्यात यशस्वी ठरला तर तो गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचेल. त्याचवेळी मिचेल मार्शच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्या स्थानावर घसरेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप