Virat Kohli | ‘तुझी बायको…’, विराट कोहलीला का आठवली दिनेश कार्तिक पत्नी?

Virat Kohli | दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात 83 धावांची दमदार खेळी करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र, कार्तिकची खेळी बेंगळुरूला मदत करू शकली नाही. आता कार्तिकच्या या चर्चेदरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली डीकेच्या पत्नीबद्दल काहीतरी बोलताना दिसत आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिनेश कार्तिक आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस, विराट कोहली, मोहम्मद सिराज आणि रजत पाटीदार यांच्यासोबत बसून प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. ‘क्रिकेटशिवाय माझा आवडता खेळाडू कोण आहे?’, असा प्रश्न दिनेश कार्तिकने विचारल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

या प्रश्नाचे उत्तर विराट कोहली (Virat Kohli) लगेच देतो आणि म्हणतो, “तुझी पत्नी.” कोहलीचे हे उत्तर ऐकून दिनेश कार्तिक म्हणतो, हे उत्तम उत्तर आहे. हे ऐकून कोहली जोरात हसायला लागतो आणि मग दिनेश म्हणतो, “माझ्या मनात वेगळेच उत्तर होते.”

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की विराट कोहलीने त्याच्या प्रश्नात दिनेश कार्तिकच्या पत्नीचे नाव का घेतले? तर दिनेश कार्तिकाच्या पत्नीचे नाव दीपिका पल्लीकल आहे आणि ती एक स्क्वॅश खेळाडू आहे. याच कारणामुळे विराट कोहलीने दिनेश कार्तिकच्या प्रश्नाला उत्तर देताना पत्नीच्या नावाचा उल्लेख केला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले