Anil Kapoor | 12 वर्षांने मोठ्या असलेल्या मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले, लवकरच लग्न आणि…

Anil Kapoor | ‘सिंघम अगेन’चा खलनायक अर्जुन कपूरच्या लग्नाबाबत मोठी बातमी येत आहे. त्याचे मामा आणि बिग बॉस OTT 3 चे नवीन होस्ट अनिल कपूर यांनी अर्जुन कपूरच्या लग्नाबद्दल भाष्य केले आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बऱ्याच महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुन कपूर आणि मलायका सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करताना देखील दिसतात. दरम्यान आता अनिल कपूर यांच्या भाष्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

एका मुलाखतीत अनिल कपूरने (Anil Kapoor) अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. त्यात एक प्रश्न अर्जुन कपूरच्या लग्नाशी संबंधित होता. अभिनेत्याशी त्याच्या कुटुंबातील सदस्यांबद्दल आणि त्याच्या शो ‘बिग बॉस ओटीटी 3’ शी संबंधित प्रश्नांबद्दल विचारण्यात आले. जेव्हा त्याला विचारण्यात आले की कुटुंबातील सर्वात फॅशनेबल कोण आहे, तेव्हा त्याने स्वतःचे नाव सांगितले. मग त्यांना विचारण्यात आले की कपूर खानदानामध्ये आता कोणाचे लग्न सर्वात अगोदर होणार आहे? अनिल कपूरने यावर प्रतिक्रिया दिली की, “आमच्या कुटुंबातील जो आता लग्न करेल तो अर्जुन कपूर आहे.”

मलायका अरोरा ही 50 वर्षाची आहे तर अर्जुन कपूर हा 38 वर्षाचा आहे. दोघांच्या वयामध्ये 12 वर्षाचा अंतर आहे. शिवाय मलायका अरोरा हिला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव अरहान खान आहे. अर्जुन कपूर याचे लग्न सर्वात अगोदर होईल, असे अनिल कपूर यांनी म्हटले. मात्र, मलायका अरोरा की, इतर कोणासोबत अर्जुन लग्न करणार यावर अनिल कपूर यांनी भाष्य केले नाहीये.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप