नाशिकमध्ये सत्यजित तांबेंचा दणदणीत विजय, शुभांगी पाटलांना ३० हजार मतांनी केले पराभूत

नाशिक- संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा (Nashik Graduate Constituency Election) निकाल अखेर समोर आला आहे. काँग्रेसशी बंडखोरी करणाऱ्या अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyjeet Tambe) यांनी नाशिकमध्ये विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांनी महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांना जवळपास ३० हजार मतांच्या मोठ्या अंतराने पराभूत केले आहे.

भाजपाचा पाठिंबा असलेले सत्यजित तांबे यांचे पारडे पहिल्या फेरीपासूनच जड होते. पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबेंनी एकूण ६८ हजार ९९९ मतं मिळवली आहेत. तर शुभांगी पाटील यांना केवळ ३९ हजार ५३४ मतांवर समाधान मानावं लागलं आहे. अशाप्रकारे शुभांगी पाटील यांचा तब्बल २९ हजार ४६५ मतांनी  दारूण पराभव झाला आहे. परिणामी सत्यजित तांबेंच्या विजयाने महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

https://youtu.be/X_lsi1Lbh_w