Arvind Kejriwal : केजरीवालांना आत्मसमर्पण करावं लागणार; तिहार तुरुंगात होणार रवानगी 

Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) रविवारी 2 जून रोजी आत्मसमर्पण करून तिहार तुरुंगात जाणार आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal Latest News) यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेला २१ दिवसांचा अंतरिम जामीन आज संपत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी 3 वाजता घरातून निघून महात्मा गांधींच्या समाधीवर पुष्प अर्पण करणार, त्यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यालयात जाणार असल्याची माहिती दिली आहे. यानंतर संध्याकाळी ते आत्मसमर्पण करतील.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे जामीनाची मुदती वाढवून मागितली होती. मात्र, हा मुदतीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच फेटाळून लावला होता. अरविंद केजरीवाल यांच्यावतीने अंतरिम जामिनाची मुदत वाढवून मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली होती. मात्र, या तत्काळ सुनावणीला सुनावणीला नकार दिला होता. त्यानंतर आज राऊस अव्हेन्यू न्यायालयानेही वैद्यकीय कारणास्तव जामीन मिळण्याच्या याचिकेवरील निर्णय ५ जून पर्यंत राखून ठेवल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

#StruggleStoryOfGeeta: ऑलिम्पिकच्या स्वप्नाला जेलीफिशचा डंख, पुण्याच्या जलपरीचा ‘दमदार कमबॅक’

Javed Inamdar : राष्ट्रीय सरचिटणीस जावेद इनामदार यांचा अजित पवार गटात प्रवेश

Sanjay Raut | ‘कॅमेरे लावून कोण ध्यानधारणा करतं? हा लोकसाधनेचा अपमान’; संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल