वयाच्या ४०व्या वर्षी अभिनेत्री दलजीत कौर चौथ्यांदा बनणार आई? म्हणाली, “आम्ही बाळाचे…”

टीव्ही अभिनेत्री आणि शालीन भानोटची माजी पत्नी दलजीत कौरने (Dalljiet Kaur) या वर्षी मार्चमध्ये लंडनस्थित उद्योगपती निखिल पटेलशी लग्न केले. दलजीत 40 वर्षांची असून तिला एक मुलगा जयडेन आहे. जयडेन हा शालीन आणि दलजीत यांचा मुलगा आहे. लग्नानंतर लगेचच, मुलगा जयडेनसह दलजीत केनियाला शिफ्ट झाली, जिथे निखिल त्याच्या ऑफिसच्या कामात अडकला आहे. त्याचवेळी निखिलचे हे दुसरे लग्न होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत. अशाप्रकारे दलजीत दुसऱ्या लग्नानंतर 3 मुलांची आई बनली आहे. आता ती चौथ्या बाळाच्या प्लॅनिंगबद्दल बोलली आहे.

टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दलजीत कौर म्हणाली, “आम्ही काही महिन्यांपूर्वीच लग्न केले आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक जोडपे बाळाची योजना करत असते. पण आम्ही बाळाचे नियोजन करत नाही. आम्हाला 3 सुंदर मुले आहेत. आणि आम्ही या प्रवासाचा आनंद घेत आहोत. जयडेनचा जन्म झाल्यापासून मी त्याच्यासोबत आहे आणि आता जयडेनला त्याच्या दोन्ही बहिणींचा सहवास अनुभवत आहे.”

दलजीत कौर पुढे म्हणाली, “आमची तिन्ही मुले एकत्र आनंदी आहेत. मी आणि निखिलने आमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एन्जॉय केली आहे. आता असे काही उरले नाही. आम्ही आमच्या मुलांसह आनंदी आहोत. आमचे संपूर्ण कुटुंब आनंदी आहे.” दलजीतने आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे सांगितले की, मला आणखी मुले नको आहेत. ती आणि निखिल त्यांच्या तीन मुलांसह आनंदी आहेत.