Heavy rain | राज्याच्या विविध भागात काल पावसाची हजेरी; पहा आज तुमच्या भागात पाऊस पडणार का ?

Heavy rain | राज्याच्या विविध भागात कालही पावसानं हजेरी लावली. सांगली जिल्ह्यातील तासगाव, कवठेमंकाळ आणि पलूस तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात काल सकाळपर्यंत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. लातूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून ६ तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. आज तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा (Heavy rain) ईशारा देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यात कालपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील अनेक भागात ओढ्यांना पूर आले. काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाला. खामगाव तालुक्यातील अंबिकापुर इथे वीज पडून २ बैल ठार झाले. सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा इथे पावसामुळे मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

अकोल्यातही पावसाने दमदार हजेरी लावली असून 16 जूनपर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसात जोरदार पाऊस पडत आहे. अनेक झोपडपट्टयांमध्ये पावसाचं पाणी शिरलं होतं. ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरणीला गती मिळणार आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वीजा, जोराचे वारे यांच्यासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांनी स्विकारला सहकार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार

Maharashtra Sadan In Ayodhya | अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन, २.३२७ एकरचा भूखंडाला उत्तर प्रदेश सरकारची मंजूरी