IND Vs IRE | भारतीय संघ टी20 विश्वचषकाची विजयाने करेल सुरुवात! असं आम्ही नाही आकडे सांगतायत

IND Vs IRE  | आयपीएल 2024 नंतर आता सर्वांच्या नजरा टी-20 वर्ल्ड कप 2024 वर लागल्या आहेत. आयसीसीचा हा मेगा इव्हेंट 2 जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी 2 सामने खेळवले जातील. अमेरिकेचा सामना कॅनडाशी होईल तर वेस्ट इंडिजचा सामना पापुआ न्यू गिनीशी होईल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. हा सामना 5 जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील आकडेवारी पाहता रोहित शर्माची सेना या विश्वचषकात विजयी सुरुवात करू शकते, असे म्हणता येईल.

हेड टू हेड आकडेवारी
जर आपण भारत आणि आयर्लंड (IND Vs IRE ) यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मधील हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर टीम इंडिया पूर्णपणे वरचढ आहे. आयर्लंडला आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाला पराभूत करता आलेले नाही. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 7 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने हे सातच्या सात सामने जिंकले आहे. दोन्ही संघांमधला पहिला टी20I 10 जून 2009 रोजी खेळला गेला.

एकूण सामने- 7
भारत जिंकला- 7
आयर्लंड जिंकला- ०

टी20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान.

टी20 विश्वचषक 2024 साठी आयर्लंडचा संघ
पॉल स्टर्लिंग (कर्णधार), मार्क अडायर, रॉस अडायर, अँड्र्यू बालबर्नी, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, ग्रॅहम ह्यूम, जोश लिटल, बॅरी मॅकार्थी, नील रॉक, हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, बेन व्हाइट, क्रेग यंग.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Atul Londhe | राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही?

Ajit Pawar | निवडणुकीच्या विजयाचा कोणीही उन्माद करू नये आणि पराभवाने खचूनही जाऊ नये

Pramod Bhangire | पुण्यातील रात्री उशिरापर्यंत चालणारे पब व हुक्का पार्लर कायमचे बंद करा, प्रमोद भानगिरेंची मागणी