मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या, प्राजक्ताने सांगितला ‘रानबाजार’ च्या शूटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

मुंबई – ‘रानबाजार’ (Ranbazar)या वेबसिरीजची (webseries) सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसिरीजची कथा तर उत्तम आहे. परंतु या कथेला सत्यात उतरवायचं काम या वेबसिरीजमधील दमदार कलाकारांनी केलं आहे. या वेबसिरीजला प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणाऱ्या या वेबसिरीजमध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या आणि अनुभवी कलाकारांच्या समावेश आहे. यात तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), प्राजक्ता माळी (Prajakta Mali), मोहन आगाशे (Mohan Agashe), मोहन जोशी (Mohan Joshi), मकरंद अनासपुरे (Makrand Anaspure), सचिन खेडेकर (Sachin Khedekar), उर्मिला कोठारे (Urmila Kothare), वैभव मांगले, अनंत जोग, अभिजित पानसे, गिरीश दातार, निलेश दिवेकर, श्रेयस राजे, अतुल काळे, वनिता खरात आणि माधुरी पवार हे नावाजलेले कलाकार दिसत आहेत.

दरम्यान, या वेब सिरीजमध्ये सोज्वळ प्राजक्ताचा बोल्ड लूक (Bold look) पाहून प्रेक्षक आश्चर्य व्यक्त करत आहेत. या वेबसीरिजसाठी प्राजक्ताने चक्क ११ किलो वजन वाढवलं आहे. हे वजन वाढवण्यासाठी तिला फार मेहनत करावी लागली. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ता म्हणाली,”जेव्हा मला वजन वाढवायचं होतं, तेव्हा मी शरीराला फार सवयी लावून घेतल्या होत्या. त्यानंतर माझं शरीर जास्त अन्न घेत नव्हतं. मी अतिप्रमाणात खात होते. त्यामुळे मला अनेकदा जुलाब, उलट्या व्हायच्या. माझे शरीर अतिरिक्त खाणे स्विकारत नव्हते. त्यामुळे त्यातून सर्व बाहेर पडत होते. पण हळूहळू मला सवय लावावी लागली.”

पॉलिटिकल क्राईम थ्रिलर (Political crime thriller) असणाऱ्या या वेबसीरिजमध्ये मोहन आगाशे हे सतीश नाईक या भूमिकेत (Mohan Agashe in the role of Satish Naik) आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची व्यक्तिरेखा अगदी हुबेहूब साकारली आहे. तर मकरंद अनासपुरे या वेबसीरिजमध्ये दिवेकर ही व्यक्तिरेखा साकारत आहेत, ते अगदी अनुभवी राजकारण हलवणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. तर दिग्दर्शक अभिजित पानसे हे पहिल्यांदा अभिनय करताना दिसत आहेत.त्यांनी इन्स्पेक्टर चारुदत्त मोकाशी ही भूमिका साकारली आहे. आणि मोहन जोशी म्हणजेच सयाजी पाटील यांच्या भूमिकेत दिसत आहेत. सचिन खेडेकर युसुफ पटेल साहेब ही व्यक्तिरेखा साकारत आहेत. तर वैभव मांगले हे इस्पेक्टर पालांडे या भूमिकेत दिसत आहेत. उर्मिला कोठारे यांनी निशा जैन ही व्यतिरेखा साकारली आहे. माधुरी पवार ही सयाजी पाटील यांची मुलगी प्रेरणा सयाजीराव पाटील या व्यक्तिरेखेत दिसत आहे. ‘रानबजार’ मध्ये आपल्याला कलाकारांचा दमदार अभिनय देखील पाहायला मिळेल. या सर्व तगड्या कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.