Diwali Special: यंदा दिवाळीला बनवा पनीर गुलाब जामुन, पुन्हा पुन्हा वाटतील खावेसे

Diwali Special : दिवाळी (Diwali) हा सण जवळ आला आहे. त्यामुळे प्रत्येक घरात साफसफाई, फराळ बनवण्याची लगबग सुरू असेल. शंकरपाळी, करंजी, चकली, चिवडा हे खासकरून दिवाळीत बनवले जाणारे पदार्थ (Diwali Special Faral) आहेत. असाच एक स्वादिष्ट आणि बनवायला सोप्या अशा पदार्थाची रेसिपी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर ताईंनो, या पदार्थाचे नाव आहे, पनीर गुलाब जामुन (Paneer Gulab Jamun).

झटपट पनीर गुलाब जामुन बनवण्यासाठी साहित्य-
– 300 ग्रॅम खवा
– 100 ग्रॅम पनीर
– 50 ग्रॅम पीठ
– 600 ग्रॅम साखर
-2-3 वेलची
– तळण्यासाठी तूप

झटपट पनीर गुलाब जामुन कसा बनवायचा-
झटपट पनीर गुलाब जामुन बनवण्यासाठी सर्वप्रथम साखरेचा पाक तयार करावा लागतो. यासाठी २ कप पाण्यात साखर घालून ते विरघळेपर्यंत शिजवा. यानंतर २-३ मिनिटे गॅस कमी करा आणि पाकात वेलची पूड घाला. आता मावा हलका गरम करा, पनीर प्लेटमध्ये काढून तळहाताने मॅश करा. लक्षात ठेवा की मावा आणि पनीर मिक्स करा आणि ते मऊ होईपर्यंत मॅश करा. आता त्यात पीठ मिक्स केल्यावर एक गुळगुळीत मिश्रण तयार करा आणि हाताने एक छोटा गोळा घेऊन गोलाकार करून गुळगुळीत करा.

यानंतर सर्व गुलाब जामुन त्याच प्रकारे तयार करा. आता गुलाब जामुन तळण्यासाठी कढईत तूप गरम करा आणि थंड झाल्यावर त्यात गुलाब जामुन टाका आणि मंद आचेवर तांबूस होईपर्यंत तळा. त्यानंतर ते बाहेर काढून साखरेच्या पाकामध्ये टाका. त्याचप्रमाणे सर्व गुलाब जामुन तयार करा. साधारण 10 मिनिटे साखरेच्या पाकात ठेवल्यानंतर, तुमचा स्वादिष्ट पनीर गुलाब जामुन तयार होईल. घरी आलेल्या पाहुण्यांना हा स्वादिष्ट पनीर गुलाब जामुन गरमागरम सर्व्ह करा.