Lok Sabha Election Results 2024 | प्राथमिक कलांमध्ये सुनेत्रा पवार आघाडीवर; सुप्रिया सुळे यांना धक्का
Lok Sabha Election Results 2024 LIVE Updates | राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील 1 लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणपणे निकालाचे कल लक्षात येणार आहेत. तर रात्री आठ वाजेपर्यंत सर्व निकाल (Lok Sabha Election Results 2024) हाती येणार आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे टपाली मतांमध्ये आघाडीवर आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत.बारामतीमधून पाहिला कल हाती आला असून पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या मात्र आता सुनेत्रा पवार आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.उत्तर मुंबई मतदारसंघातून पियूष गोयल आघाडीवर असल्याचे प्राथमिक कल समोर आले आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Lok Sabha Election Results : लोकसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर, भाजपने ‘या’ मतदारसंघात मिळवला विजय
Supriya Sule : कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश, सुप्रिया सुळेंची टीका