दारुच्या नशेत असल्यानं पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विमानातून खाली उतरवलं ? 

चंडीगड – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Maan) यांच्यावर धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. दारुच्या नशेत असल्यानं भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवण्यात आल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे (Shiromani Akali Dal) नेते सुखबीर सिंग बादल (Sukhbir Singh Badal) यांनी केला आहे. (Chief Minister of Punjab was taken down from the plane because he was drunk?)

बादल यांनी केलेल्या आरोपानुसार, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून  खाली उतरविण्यात आल्याचा दावा सुखबीर बादल यांनी केला आहे. सुखबीर यांच्या म्हणण्यानुसार, सीएम मान यांनी जास्त दारू प्यायल्याने एअरलाइन्सने हे पाऊल उचलले. मुख्यमंत्र्यांना  उभेही राहता येत नव्हते. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत बादल यांनी हा दावा केला आहे.

ते म्हणाले की, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना लुफ्थांसा एअरलाइन्समधून काढून टाकण्यात आल्याचे धक्कादायक मीडिया रिपोर्ट्स सोबतच्या प्रवाशांच्या हवाल्याने आले आहेत कारण त्यांनी खूप मद्य प्राशन केले होते. त्यामुळे विमानाला चार तास उशीर झाला.ही घटना जगभरातील पंजाबींना लाजवेल अशी आहे. दुसरीकडे आम आदमी पक्षाने मुख्यमंत्री भगवंत मान यांना विमानातून खाली उतरवल्याच्या बातम्या निराधार असल्याचं म्हटलं आहे.