“मला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा माझ्या वडिलांनी…”, टीव्ही अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा

Sumbul Touqeer Interview:  टीव्ही अभिनेत्री सुंबूल तौकीर (Sumbul Touqeer) अलीकडेच शो ‘बिग बॉस सीझन 16’ मध्ये दिसली होती. या शोपासून ही अभिनेत्री सतत चर्चेत असते. आता अलीकडेच सुंबुलने आपल्या वडिलांसोबतच्या नात्याबद्दल खुलासा केला असून प्रत्येक पावलावर तिचे वडील तिची ढाल बनून उभे असल्याचे सांगितले आहे.

नुकत्याच एका मुलाखतीत सुंबूलने आपल्या वडिलांसोबतच्या नातेसंबंधाचा खुलासा केला आणि सांगितले की आज तिने जे काही यश मिळवले आहे त्याचे श्रेय तिच्या वडिलांना जाते. अभिनेत्री म्हणाली, ‘मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझे वडील खूप समजूतदार आहेत आणि मी सहा वर्षांची असल्यापासून त्यांनी माझी काळजी घ्यायला सुरुवात केली. त्यांनी एकट्यांनीच आम्हा दोघी बहिणींना वाढवले ​​आहे. आम्हाला उठवणं आणि शाळेसाठी तयार करणं, नाश्ता बनवणं, घर सांभाळणं, आमची स्वतःची नृत्यशाळा चालवणं, हे सगळं त्यांनी एकट्याने केलं आहे.’

सुंबुलने आपल्या वडिलांच्या योगदानाबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘माझ्या वडिलांपेक्षा आयुष्यात मला कोणीही साथ दिली नसती. मला पहिल्यांदा मासिक पाळी आली तेव्हा माझे वडील तिथे होते, मला मार्गदर्शन करायला आजूबाजूला कोणीही नव्हते. मी बाबांना सांगितले आणि त्यांनी मला मदत केली. त्यांना माझ्या आणि माझ्या आयुष्याबद्दल सर्व काही माहित आहे.’

‘आई-वडिलांच्या नात्याचा मी नेहमीच आदर केला आहे. दोघांनाही वेगळे व्हायचे असेल तर त्यांची मुलगी म्हणून मला त्यांचा निर्णय स्वीकारावा लागला, कारण ते माझे कर्तव्य होते. मला वाटतं दोन्ही नात्यांचा आदर करायला हवा,’ असे सुंबुल शेवटी म्हणाली.