LokSabha Election Results 2024 | उदयनराजे भोसले पिछाडीवर; रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून कोण आहे आघाडीवर ?

LokSabha Election Results 2024 LIVE Updates | देशाचा पंतप्रधान कोण होणार हे ठरविणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा आज निकाल जाहीर होत आहे. NDA विरुद्ध ईंडी आघाडी असा थेट सामना या निमित्ताने होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा देशाचे पंतप्रधान होणार का हे आजच्या निकालावरून स्पष्ट होणार आहे.

देशात या लोकसभा निवडणुकांच्या निकालाचा (LokSabha Election Results 2024) सर्वच आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातच महाराष्ट्रातील निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. यंदा राज्यातील निवडणूक ही अत्यंत चुरशीची झाली असून अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान, साताऱ्यामध्ये भाजपाचे उदयनराजे भोसले पिछाडीवर पडले असून शरद पवार गाटचे उमेदवार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. दुसरीकडे सांगलीमधून अपक्ष उमेदवार असलेले विशाल पाटील आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नारायण राणे आघाडीवर आहेत. ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत पिछाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. पहिल्या फेरीत शाहू महाराज 1036 मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप