Loksabha Election Results 2024 | चौथ्या फेरीअखेर पुण्यातून मुरलीधर मोहोळ १८ हजार मतांनी आघाडीवर, बारामती-मावळचे चित्र काय?

Loksabha Election Results 2024 | पश्चिम महाराष्ट्रात चौथ्या फेरीअखेर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. पुणे लोकसभा मतदार संघ आणि मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर शिरूर लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे.

पुण्यातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी चौथ्या फेरीअखेर आपली आघाडी टिकवून ठेवली आहे. ते १८ हजार मतांनी पुढे आहेत. तर महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर अजूनही मागेच आहेत. तर मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तब्बल १४,९४५ मतांनी आघाडीवर असून संजोग वाघेरे यांना लीड मोडण्याचे (Loksabha Election Results 2024) आव्हान असेल.

बारामतीत मात्र क्षणाक्षणाला चित्र बदलताना दिसत आहे. चौथ्या फेरीनंतर महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळेंनी महायुतीच्या सुनेत्रा पवारांना १९ हजार मतांनी मागे सोडले आहे. शिरुर येथे सुरुवातीपासूनच महाविकास आघाडीच्या अमोल कोल्हेंनी मतांची आघाडी घेतली असून ३९०२५ मते त्यंच्या नावावर आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप