Loksabha Election Results 2024 | लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजपाच्या उमेदवाराने स्विकारला पराभव, म्हणाले…

Loksabha Election Results 2024 | नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी यांच्यातील लढतीचे चित्र अखेर आज स्पष्ट होणार आहे. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार येणार की राहुल गांधींची इंडिया आघाडी सत्ता स्थापन करणार, हे आज कळणार आहे. लोकसभा निवडणूक 2024 साठी मतमोजणीला सकाळपासून सुरुवात झाली असून एनडीए सरकार आघाडीवर असल्याचे दिसत आहे. मात्र राहुल गांधी यांनी वायनाड आणि रायबरेली या दोन्हीही मतदारसंघातून आघाडी घेतली असून सध्या ते दोन लाख 12 हजार मतांनी पुढे आहेत. राहुल गांधी यांना आतापर्यंत तीन लाख 82 हजार 467 मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांना 170104 मते मिळाली.

दरम्यान रायबरेलीचा अंतिम निकाल लागण्यापूर्वीच भाजपाचे उमेदवार दिनेश प्रताप सिंह यांनी पराभव (Loksabha Election Results 2024) स्विकारला आहे. फेसबुक पोस्ट करत दिनेश प्रताप सिंह यांनी लिहिले, मला सापडलेला कर्तव्याचा मार्ग… रायबरेलीच्या देवासारखी लोकांची सेवा मी अत्यंत विनम्रतेने आणि परिश्रमाने केली आहे, तरीही माझ्या सेवेदरम्यान माझ्या विचारात, शब्दात किंवा कृतीत काही चूक झाली असेल किंवा कोणाला त्रास झाला असेल तर आम्ही रायबरेलीच्या जनतेची माफी मागतो.

मी माझ्या सर्व हितचिंतकांचे आणि पक्षाच्या सदस्यांचे मनापासून आभार मानतो ज्यांनी अथक परिश्रम केले, निवडणुका खूप चांगल्या प्रकारे लढल्या गेल्या पण निर्णय आमच्या हातात नव्हता. जनता ही देवाची मूर्ती आहे, ते जे काही आदेश देतील ते नेहमीच त्यांच्या डोक्यावर असतील. रायबरेलीच्या लोकांनो, आजही विश्वास आहे की रायबरेलीतील तुमच्या कुटुंबातील हा भाऊ तुमच्या सुख-दु:खात सदैव तुमच्यासोबत असेल, अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप