मोदीजींची गॅरेंटी म्हणजे, गॅरेंटी पूर्ण होण्याची गॅरेंटी! भाजपाच्या संकल्पपत्रावर मुरलीअण्णांची प्रतिक्रिया

Murlidhar Mohol : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) भारतीय जनता पार्टीने संकल्पपत्र (BJP Manifesto) म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गॅरेटीचा दस्तावेजच आहे. हे संकल्प पत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठीचा जणू रोड मॅपच दिलेला आहे, अशा शब्दांत पुणे लोकसभेचे भाजपा-महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी भाजपाच्या संकल्पपत्रावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, जनसंघ आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रत्येक संकल्पपत्रात अयोध्येत श्री राम मंदीर बांधणे आणि काश्मिरमधील ३७० कलम हटवण्याबरोबरच समान नागरी देशात आणण्याचा संकल्प पक्षाने केला होता.

देशातील मतदारांनी पंतप्रधान मोदींवर विश्वास ठेवून केंद्रात बहुमताने सलग दोन वेळा सरकार निवडून दिले आणि देशवासीयांना अयोध्येत रामाचे दर्शन घेता येऊ लागले, तसे काश्मिरमध्ये मुक्तसंचार करता येऊ लागला आहे. पुढील पाच वर्षात समान नागरी कायद्यासह काही मोठी उदिष्ट ठेवली आहेत. ती सर्व पूर्ण होतील, या मोदींच्या गॅरेंटीवर देशवासीयांचा आणि पुणेकरांचा विश्वास आहे. देशवासीयांच्या विश्वासावरच हे मोदींच्या गॅरेंटीचे संकल्पपत्र देशवासियांसमोर मांडले आहे, असेही मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | यशाचे ‘शिखर’ गाठण्यासाठी निसर्गप्रेमींची साथ उर्जा देणारी

Sunetra Pawar: शरद पवारांनी ‘बाहेरचे पवार’ असा उल्लेख केल्याने सुनेत्राताईंना अश्रू अनावर, म्हणाल्या….

Sunil Tatkare | २०१९ पेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल