Mahadev Jankar | परभणी लोकसभा मतदारसंघातून मी विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच दिल्ली जाणार

Mahadev Jankar |राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाचे निकाल जाहीर होणार आहेत. राज्यातील 1 लाख 26 हजार 279 मतदान केंद्रावरील मतदानाची मोजणी करण्यात येणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दुपारी बारा वाजेपर्यंत साधारणपणे निकालाचे (LokSabha Election Results 2024 LIVE Updates)कल लक्षात येणार आहेत. तर रात्री आठ वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत.

दरम्यान, परभणी लोकसभा मतदारसंघातून मी विजयाचे प्रमाणपत्र घेऊनच दिल्ली जाणार आहे राज्यातील एक्झिट पोल जरी माझ्या आणि महायुतीच्या विरोधात असले तरीसुद्धा मी तर विजय होणारच शिवाय महायुतीच्याही 41 जागा येणार असल्याचा विश्वास महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केलाय.

कार्यकर्त्यांनी गावागावांमध्ये विजयाचा उत्सव शांतपणे साजरा करावा असा आवाहनही त्यांनी केले महत्त्वाचे म्हणजे जाणकारांना मतमोजणी सुरू होण्या आधीच कार्यकर्त्यांकडून विजयाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप