Maharashtra Politics | लोकसभेत बिनशर्त पाठिंबा, विधानपरिषदेला जुंपली! कोकण पदवीधर मतदारसंघावरून भाजप आणि मनसे आमने-सामने
लोकसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Politics) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. लवकरच राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. मात्र, या निवडणुकीआधीच मनसे आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे (Abhijeet Panse) यांना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र महायुतीने पानसेंना पाठींबा दर्शवण्याऐवजी निरंजन डावखरे यांना उमेदवारी देऊ केली आहे. यावरुन मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी (Maharashtra Politics) जाहीर केल्यानंतर भाजपने निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेला जागा, राज्यसभा किंवा आणखी काहीही अपेक्षा न ठेवता खुल्या मनाने नरेंद्र मोदींसाठी महायुतीला पाठिंबा दिला. खरंतर राज ठाकरेंचा हा एकप्रकारे ‘राजकीय त्याग’ होता, असे ट्विटद्वारे योगेश खैरे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले, त्यागाची भरपाई म्हणून नव्हे तर नैतिक भूमिका म्हणून मनसेला महायुतीने पाठिंबा द्यायला हवा होता अशी प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची अपेक्षा होती. पण असो…. मनसे आता ही निवडणूक लढवत आहे आणि जिंकणार सुद्धा आहे!, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिजित पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघात उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने निरंजन डावखरे यांची उमेदवारी जाहीर केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभेला जागा, राज्यसभा किंवा आणखी काहीही अपेक्षा न ठेवता खुल्या मनाने नरेंद्र मोदीजींसाठी महायुतीला…
— Yogesh Khaire योगेश खैरे (@YogeshKhaire79) June 3, 2024
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
महत्वाच्या बातम्या :
Exit Poll : रायबरेलीत राहुल गांधी जिंकतील का? निकालापूर्वी एक्झिट पोलने काय सांगितले?