मविआचा पुण्यासाठी जागा वाटपाचा फॉर्मूला ठरला! ठाकरेंना २ तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस इतक्या जागा लढणार

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत सध्या दावे प्रतीदावे होताना पाहायला मिळत आहेत. महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) महायुतीतील (Mahayuti) घटक पक्ष आपल्याला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात त्यासाठी प्रयत्नशील आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या भरघोस यशा नंतर कॉन्फिडन्स मध्ये असलेले महा विकास आघाडीतील तिन्ही पक्ष आपल्याला जास्त जागा मिळाव्यात यासाठी आग्रही असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. सध्या जागा वाटपाबाबतची अधिकृत चर्चा जरी सुरू झाली नसली तरी प्राथमिक चर्चा मात्र झाल्या आहेत. नुसार काही बेसिक फॉर्मुले समोर आले आहेत. यामध्ये पुण्याचा फार्मूला देखील वरिष्ठ पातळीवरती ठरला असल्याचं बोललं जात आहे.

पुणे लोकसभेची जागा महाविकास आघाडीला गमवावी लागली असली तरी विधानसभेमध्ये पुण्यामध्ये महाविकास आघाडीला आपण चांगलं यश मिळू असा विश्वास आहे. त्यानुसारच महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी पुण्यातील जास्तीत जास्त आपल्याकडे घ्या अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना ठाकरे गट पुण्यातील सहा विधानसभेच्या जागांसाठी आग्रही आहे. तर पुण्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेसने अद्याप मौन स्वीकारले आहे.

दरम्यान आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी पुण्यात आपल्या पक्षाला सहा जागा मिळाव्यात अशी मागणी केली आली तरी वरिष्ठ पातळीवर पुण्याचा जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झालेली आहे. त्यानुसार काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला प्रत्येकी ३ तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाला २ जागा मिळणार आल्याचे बोले जात आहे.

तीनही पक्षांच्या प्राथमिक चर्चेनुसार शहरातील कसबा, पुणे कॅन्टोमेंट आणि शिवाजीनगर या तीनही जागा काँग्रेसकडे असतील. तर खडकवासला, पर्वती आणि हडपसर या जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवले तर कोथरूड आणि वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला दिले जातील असे बोले जात आहे.

स्थानिक पातळीवर जागांचा वाद असला तरी तीनही पक्षाच्या नेत्यांंकडून ज्या जागा निश्चित आहेत. त्यावर काम सुरू करण्याच्या सूचना स्थानिक पदाधिकाऱ्यांंना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
OBC Reservation | अखेर दहा दिवसांनंतर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचे उपोषण स्थगित

बांगलादेशविरुद्धच्या सुपर-8 सामन्यात संजू सॅमसनला संधी मिळणार? रोहित-द्रविडने संकेत दिले

12 वर्षांने मोठ्या असलेल्या मलायका अरोरासोबत करणार अर्जुन कपूर लग्न?, अनिल कपूर म्हणाले, लवकरच लग्न आणि…