ठाकरे प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते; शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल

MLA Disqualification Case Verdict : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी काल दिला. शिवसेनेत 21 जून 2022 रोजी फूट पडली. त्या दिवसापासून सुनिल प्रभू (Sunil Prabhu) यांचं प्रतोद पद अवैध ठरतं, त्यामुळं त्यांनी जारी केलेला व्हिप किंवा त्यांनी आयोजित केलेली बैठक वैध ठरत नसल्याचं नार्वेकर यांनी काल दिलेल्या निकालात स्पष्ट केलं. तसंच नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती वैध ठरवली आहे.

21 जून 2022 रोजी रोजी एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केलं आणि नंतर त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही गटांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तर उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे न्यायालयानं एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची शपथ वैध ठरवली. प्रतिस्पर्धी गटानं दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी सभापतींनी शिवसेना पक्षाच्या मूळ घटनेवर अवलंबून राहणे आवश्यक असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. त्यानुसार नार्वेकर यांनी 1999 ची शिवसेना पक्षाची घटनाही वैध मानली आहे.

दरम्यान, या निकालावर आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत.

आमदार अपात्रतेच्या निकालाचं स्वागत करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. हा निकाल लोकशाहीचा विजय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. तर ठाकरे प्रायव्हेट कंपनीप्रमाणे पक्ष चालवत होते असा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

सत्तेत आल्यापासून कायम एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार असे सारखे बोलत होते. परंतु अजूनही मी सत्तेत कायम आहे. हुकुमशाहीनं पक्ष चालवणाऱ्यांना या निर्णयामुळे मोठा झटका मिळाला आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक