भयानक! २१० किलो वजन उचलण्याच्या नादात प्रसिद्ध फिटनेस इन्फ्लुएंसरचा दुर्देवी मृत्यू – video

प्रसिद्ध फिटनेस इन्फ्लुएंसर जस्टिन विक्कीचा (Justyn Vicky) इंडोनेशियामध्ये 15 जुलै रोजी जिममध्ये खांद्यावरून वजन उचलताना मृत्यू झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये जस्टिन विकी ट्रेनरच्या मदतीने बारबेल उचलत असताना बारबेलचा तोल त्याच्या मानेवर पडून त्याची मान तुटल्याचे दिसून येते. या प्रसंगानंतर तो उभा राहू शकत नाही.

माध्यमांतील वृत्तांनुसार, जस्टिन विकी 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. जेव्हा तो जखमी झाला तेव्हा त्याला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची मान मोडली गेली आणि त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना जोडणाऱ्या महत्वाच्या नसा गंभीरपणे संकुचित झाल्याची नोंद झाली. त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया झाली असली तरी काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. जस्टिनचा असा दुर्देवी अंत झाल्याने सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली जात आहे.

https://twitter.com/royeknus/status/1682219410973655040?s=20