Pune Accident | आळंदीत भांडणाच्या रागातून अल्पवयीन मुलाने महिलेच्या अंगावर कार घातली

Pune Accident Video | पुण्यातील आळंदी परिसरात अल्पवयीन कार चालकाकडून महिलेला चिरडण्याचा प्रयत्न करण्याात आला आहे. पूर्ववैमनस्यातून अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कार चालकाविरोधात आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आळंदी जवळील वडगाव घेणंद हा प्रकार (Pune Accident Video) घडला आहे. अल्पवयीन कार चालकाकडुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समोरील जमावाला चिरडण्यासाठी अल्पवयीन तरुणाने कार पाठीमागे घेऊन जात पूर्ण वेगाने चालवत महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा थरार कॅमेरात कैद झाला आहे. सुदैवाने महिलेला कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र तरुणाच्या या मुजोरगिरीवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

एवढच नााही तर हा अपघाताचा थरार झाल्यानंतर हा तरुण कारच्या छतावर बसून शिवीगाळ करत होता. पूर्वीच्या भांडणाचा राग धरुन महिलेसह नागरिकांना चिरडण्याचा प्रकार केल्याबाबत आळंदी पोलीसांत फिर्याद देण्यात आली. नाजुका थोरात यांच्या फिर्यादीवरुन आळंदी पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप