Pune News | 28 वा शाहीर मधु कडू प्रतिष्ठान कला गौरव पुरस्कार विनोदी अभिनेते भाऊ कदम यांना प्रदान

Pune News |  बुधवार दिनांक 15 मे 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे भरगच्च भरलेल्या पेक्षा गृहात हजारो काला प्रेक्षकांच्या उपस्थितीत विनोदी अभिनेते भालचंद्र उर्फ भाऊ कदम (Bhau Kadam) यांना 28 वा शाहीर मधू कडू स्मृती नटरंग प्रतिष्ठान काला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभहस्ते पुरस्कार  प्रदान करण्यात आला करण्यात याप्रसंगी कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज कालावंतांची उपस्थिती लाभली ज्येष्ठ अभिनेत्री आशाताई काळे अभिनेत्री प्रियाताई बेर्डे अभिनेत्री जयमालाताई इनामदार शाहीर दादा पासलकर तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी यांची उपस्थिती होती सामाजिक क्षेत्रातून अनेक दिग्गज कार्यक्रमास उपस्थित होते डॉक्टर प्रमोद भालेराव, ललित जैन शाहीर मधू कडू यांचे चिरंजीव विजय कडू, राजेश येनपुरे यांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली (Pune News).

आपला मनोगतात संस्थेच्या अध्यक्षा सौ स्वरदा गौरव बापट यांनी नटरंग संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. संस्थेतील संस्थेच्या भविष्यातील उपक्रमाबद्दल उपस्थितना माहिती दिली.चंद्रकांत दादांनी नटरंग संस्थेस सर्वतोपेरी सहकार्य करण्याचे वचन देत भाऊ कदम हे गिरणी कामगारांच्या व्यथांमधून मिळालेले यश आहे .असे प्रतिपादन केले. भाऊ कदम हे अतिशय शांत संयमी व सुसंस्कृत अभिनेते आहेत असे गौरवोद्गार चंद्रकांत दादांनी काढले.

आपल्या सत्काराला उत्तर देताना अभिनेते भाऊ कदम यांनी प्रेक्षागृह ते रंगमंचावरील पुरस्कार स्वीकारण्याचा क्षण यास 24 वर्षे चा काळ लोटला असे भावनाप्रधान वाक्य उच्चारून आपले मनोगत सुरू केले. आपण दूरचित्रवाणीवर काम करत असल्याने प्रसिद्धी मिळत असल्यामुळे या पुरस्कारांचे स्वागत आहे मात्र अनेक कलाकार हे अजून प्रसिद्धीच्या झोतात आले नसून त्यांचाही संस्थेने विचार करावा असे मत व्यक्त केले.

आभार प्रदर्शन संस्थेची माजी विद्यार्थिनी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सर्व उपस्थित त्यांना तिच्या सुंदरशैलीत खिळवून ठेवत आभार प्रदर्शन केले.याच प्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट यांच्या नावाने पुरस्कार मागील वर्षीपासून सुरू केला यंदाचा दुसरा स्वर्गीय गिरीश बापट स्मृति नटरंग प्रतिष्ठान कृतज्ञता पुरस्कार हा ठाणे येथील डॉक्टर ज्योती सावंत यांना माननीय चंद्रकांत दादांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .डॉक्टर ज्योती सावंत यांच्या सामाजिक कलात्मक कार्याचा आढावा घेऊन त्यांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. पुरस्कार सोहळ्याचे निवेदन हे  स्नेहल मोटकर बागुल यांनी केले.

पुरस्कार वितरण समारंभा पूर्वी 150 कलावंतांच्या नृत्यरंग या कार्यक्रमातील श्रीराम वंदनेने कार्यक्रमांमध्ये रंग भरले . कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन जतिन पांडे यांची असून श्री प्रणव कडेकर व  पुष्कर तावरे यांनी कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

You May Also Like