माझ्या आजवरच्या यशस्वी राजकीय प्रवासात सर्वात मोठं योगदान हे माझ्या पतीचं आहे – चाकणकर

Rupali Chakankar Praises Husband: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या धडाडीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट केली असून या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

त्या म्हणतात, सामाजिक जीवनात सक्रिय असताना व्यक्तिगत आयुष्यात परिवाराचा पाठिंबा आणि जोडीदाराची खंबीर साथ ही मोलाची ठरते. राजकीय सामाजिक जीवनाचा प्रवास एका महिलेसाठी नक्कीच तारेवरची कसरत करणारा ठरतो, पण जर आपल्या पतीची खंबीर साथ लाभली तर यशाची शिखरे पार करत असताना कसलीच अडचण येत नाही.

मी स्वतःला नशीबवान समजते की माझ्या आयुष्यात मला लाभलेले जोडीदार प्रत्येक क्षणी अगदी खंबीरपणे माझ्यासोबत उभे असतात. निलेश चाकणकर यांच्याशी विवाह करून या परिवारात आले त्या दिवसापासून मला परिवाराचे संस्कार अन अडी अडचणीत मिळणारी साथ मोलाची ठरली. माझ्या आजवरच्या यशस्वी राजकीय प्रवासात सर्वात मोठं योगदान हे माझ्या पतीचं आहे. आज आमच्या लग्नाचा वाढदिवस त्यानिमित्ताने माझा वैवाहिक प्रवास डोळ्यासमोर तरळला, सुख, दुःख, आनंद, यश अपयश सर्वकाळ सोबती राहून त्यांनी सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहन दिले. अस म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी ती नशीबवान महिला आहे जिच्या यशात सर्वात मोठा वाटा पतीचा आहे.

आज शब्दांनी शुभेच्छा देताना शब्द कमी पडतील एवढं तुमचं कौतुक आहे, ही साथ कायम राहील हा मनात विश्वास आहे, प्रेमाने जग जिंकणाऱ्या तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाची साथ आहे.साहेब आज आपल्या लग्नाचा वाढदिवस, त्यानिमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..! असं म्हणत चाकणकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या-

राज्यातल्या दूषित वातावरणाला खोके सरकार जबाबदार, खोके सरकारने महाराष्ट्राचे राजकारण दूषित केले – सुळे

कर्णधार सापडला पण हार्दिकसारखा अष्टपैलू कसा सापडणार? या 5 खेळाडूंवर गुजरातची नजर असेल

आम्ही जुमलेबाज, भ्रष्ट पक्षांसारखे नाही; सुप्रिया सुळे यांचा दावा