Eknath Shinde | आनंद दिघेंच्या संपत्तीवर उद्धव ठाकरेंचा डोळा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निशाणा

Eknath Shinde | धर्मवीर आनंद दिघे साहेबांची लोकप्रियता वाढत होती. यशाच्या शिखरावर असताना त्यांना त्रास देण्याचे काम त्यांनी केले. इतकेच काय त्यांचे जिल्हाध्यक्षपद काढून घेण्याचे कारस्थान सुरु होते. दिघेंचे आयुष्य आश्रमात गेले मात्र जेव्हा निधन झाले तेव्हा दिघे साहेबांची कुठे कुठे प्रॉप्रटीवर आहे, असा पहिला प्रश्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) विचारला होता. दिघे यांच्या प्रॉपर्टीवर उद्धव ठाकरेंचा डोळा होता, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांनी केली.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की दिघेंचे जिल्हाध्यक्षपद काढले तर ठाणे जिल्ह्यात पक्षच उरणार नाही, असे जेव्हा त्यांना समजले तेव्हा थांबले. उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंचे नाव सुचवले म्हणून दिघेंना त्रास देण्यात आला, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

धर्मवीर आनंद दिघे यांनी मला आयुष्यात उभे केले. तुला समाजासाठी काम करायचेय हे दिघेंचे शब्द आजही कानात घुमतात. धर्मवीर सिनेमात यासंदर्भात राजन विचारे यांनी राजीनामा देऊ केल्याचा दाखवलेला प्रसंग काल्पनिक आहे. प्रत्यक्षात त्यावेळी राजन विचारे राजीनाम देण्यास तयार नव्हते. जेव्हा दिघे साहेबांनी त्यांच्या भाषेत समजावले तेव्हा विचारे यांनी राजीनामा दिला. आता खरी वस्तुस्थिती सिनेमाच्या दुसऱ्या भागात समोर येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा