Thane LokSabha | मी फार प्रेमळ आहे पण ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो, शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

Thane LokSabha | रोज सकाळी भोंगा वाजतो. दुपारी दुसरा भोंगा वाजतो. तुम्ही २०१९ मध्ये जनतेशी बेईमानी केलीत. बाळासाहेबांचे विचार सोडून कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलात. देवेंद्र फडणवीसांनी ५० फोन केले पण तुम्ही एकही फोन उचलला नाही, उद्धव ठाकरेंचा कृतघ्नपणा यातून दिसून आला. राममंदीर उदघाटनाला जाऊ शकला नाहीत, हे तुमचे दुर्दैव आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

ठाणे लोकसभा (Thane LokSabha) मतदारसंघाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आयोजित महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. महायुतीकडे नेशन फर्स्ट आहे तर महाविकास आघाडीकडे कट करप्शन कमिशन आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली. मी फार प्रेमळ आहे पण ठरवले तर करेक्ट कार्यक्रम करतो, असा इशारा त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिला. मी कार्यकर्ता म्हणून प्रचाराला जातो, मुख्यमंत्री म्हणून नाही. मी जिथे जातो तिथे विरोधकांचा बाजार उठून जातो, अशी टीका त्यांनी केली.

नरेश म्हस्के हेच आनंद दिघेंचे खरे शिष्य

ठाणे मतदार संघाबाबत आमच्या भावना जोडलेला आहे. दिघेंचा बालेकिल्ला आहे. बाळासाहेबांचे विचार सोडल्यांसोबत गेलेले राजन विचारे हे दिघे साहेबांचे नकली शिष्य आहेत तर नरेश म्हस्के असली शिष्य आहेत. बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण आपल्यासोबत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | गड किल्ल्यांचे संवर्धन करणार, मुरलीधर मोहोळ यांचे आश्वासन

Eknath Shinde | काँग्रेसने २६/११ हल्ल्यातील शाहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Raj Thackeray In Pune | मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे पुण्यात, ‘या’ दिवशी घेणार जाहीर सभा