Nagpur | ज्या समाजासाठी जरांगे लढत होते आज त्यांनीच ‘जरांगे पाटील मुर्दाबाद’ म्हणत जाळला पुतळा

Nagpur : मराठा आंदोलक (Maratha protestors) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर गंभीर आरोप करताना अतिशय खालच्या पातळीवरील भाषा वापरली होती. हि टीका करताना देवेंद्र फडणवीस यांच्या जातीचा उल्लेख केल्याने तसेच राजकीय स्वरूपाचे आरोप केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जरांगे यांनी फडणवीस यांना शिवीगाळ देखील केल्याने उलटसुलट चर्चा देखील सुरु झाल्या आहेत.   यातच आता दुसऱ्या बाजूला मनोज जरांगेंच्या या टीकेविरोधात नागपुरात (Nagpur)आंदोलन करण्यात आलं. नागपूरच्या गांधी गेट परिसरात सकल मराठा समाज विदर्भ प्रांताच्या वतीने मनोज जरांगेंचा निषेध करण्यात आला.न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

आंदोलकांनी जरांगे पाटील यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसंच जरांगेंचा प्रतिकात्मक पुतळाही पेटवण्यात आला. जरांगे पाटील मराठा समजाच्या आरक्षणाचं नेतृत्व करत होते, पण आता समाज म्हणजे मी असे वागत आहेत, त्यांची भाषा आक्षेपार्ह आहे, अशी टीका आंदोलकांनी केली. जरांगेंच्या शब्दप्रयोगावरून मराठा समाजाच्या अस्मितेला ठेच लागत आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात आंदोलन केल्याचं सकल मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

‘एकच मिशन, पुणे नंबर वन’ हा संकल्प घेऊन पुण्यासाठी कार्यरत राहणार – Shivaji Mankar

जास्तीत जास्त युवक-युवतींना मेळाव्यातून रोजगार मिळण्यासाठी रोजगार इच्छूकांची नोंदणी वाढवावी, उपमुख्यमंत्री पवारांचे आवाहन

जनतेला लिहिलेल्या खुल्या पत्रात पवार साहेबांचं नाव लिहिण्याचे धाडस दादांमध्ये नाही