Lok Sabha Election 2024 | नणंद-भावजय येणार आमने-सामने; जाणून घ्या बारामती लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड ?

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील फुटीनंतर पवार घराण्यात संघर्ष वाढत आहे. आजवर जेष्ठ नेते शरद पवारांवर लोकाची घरे फोडल्याचा आरोप होत होता मात्र आता पवारांना त्यांच्याच घरातून आव्हान निर्माण झाले असून आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये (Baramati Lok Sabha constituency) नणंद भावजय यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे.

बारामतील लोकसभा मतदारसंघाच्या सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत, तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी सातत्याने चर्चेत येत आहे. अजितदादा यांना महायुतीची साथ मिळाली तर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव शक्य असल्याचे अनेकांनी अंदाज वर्तवले आहेत यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित आहे.

बारामतीत स्वतः अजित पवार यांचा दरारा आणि ताकत आहे. दौंड मध्ये आमदार राहुल कुल यांच्यासह अनेकजण अजित पवारांना मदत करू शकतात. इंदापुरात पाटील-भरणे तर खडकवासल्यात भाजपची तसेच अजित पवार गटाची ताकत आहे. पुरंदरमध्ये देखील महायुतीला मते पडतील अशी शक्यता आहे तर भोरमध्ये थोपटे यांच्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील ही लढत देशातील सर्वाधिक लक्षवेधी लढतीपैकी एक लढत असेल. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भावजय सुनेत्रा पवारच निवडणुकीच्या रिंगणात असणार हे जवळपास निश्चित झालं आहे. महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळणार आशून यात नेमकं कोण बाजी मारणार हे निवडणूक निकालानंतरच समजेल.

महत्वाच्या बातम्या

Lok Sabha Elections | भाजपचे आजपासून राष्ट्रीय अधिवेशन; लोकसभा निवडणुकीचा रोडमॅप तयार

Rooftop Solar Scheme | घराच्या छतावर सोलर पॅनेल लावायचे आहेत? बँका गृहकर्ज देऊन वित्तपुरवठा करणार आहेत

‘भाजपामुळे राज्याची संस्कृती बिघडली, चिखलफेकीसाठी टोळ्या भाड्याने…’; चिपळूणच्या राड्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया