Sharad Pawar | एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही, शरद पवार स्पष्टपणे बोलले

Sharad Pawar  | मोदींनी मुस्लिम समाजाचा वेगळा उल्लेख केला. हा देश एकसंघ ठेवायचा असेल, इथे हिंदु, मुस्लिम, शीख, इसाई, जैन या सगळ्या घटकांना एकत्र ठेऊन ऑपल्याला हा देश पुढे न्यावा लागेल. त्यातील एका किंवा दोन् समाजासंबंधी काही वेगळी भूमिका आपण मांडायला लागलो, तर समाजात ऐक्य राहणार नाही, गैरविश्वास राहील. आणि मोदींची अलीकडची काही भाषणं ही समाजा-समाजात गैरविश्वास व्हायला पोषक आहेत, आणि हे देशाच्या दृष्टीने घातक आहेत. जे देशाच्या हिताचं नाही, तिथे मी किंवा माझे सहकारी असणार नाहीत. असे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

पुढे शरद पवार (Sharad Pawar ) म्हणाले की, आमच्या बुद्धीला जे पटेल, ज्या विचारधारेत आम्ही वाढलो, जी विचारधारा घेऊन आम्ही पुढे जातो, त्याच्या बाहेर आम्ही जाणार नाही. निवडणुकीच्या ३-४ टप्प्यांमध्ये मोदींच्या विरोधात जनमत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे, असं चित्र आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. त्यांची अस्वस्थता अशा विधानं ही सांगतात, किंवा संभ्रम तयार करण्याची भूमिका सांगतात. असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, SC, ST यांचं आरक्षण वाढवायचं असेल, तर त्याला आमचा विरोध नाही. अवश्य वाढवा. पण, एखाद्या समाजाचं आरक्षण कमी करणं, एखाद्या समाजाविषयी राज्यकर्त्यांनी अशी भूमिका घेऊन कसं चालेल? प्रधानमंत्री सगळ्यांचे असतात, देशाचे असतात, जे देशाचे नेतृत्व करतात, त्यांनी एका धर्म, जाती व भाषेचा विचार करण्याची सुरुवात केली तर या देशाचं ऐक्य संकटात येईल, मग ते प्रधानमंत्री असो किंवा त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री असो. असेही पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, गांधी-नेहरूंची विचारधारा आम्हाला प्रिय आहे. ती सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात मुस्लीम समाजाबद्दल काहीतरी भाष्य केल्याचे आम्ही ऐकले. हा देश पुढे घेऊन जायचा असेल तर सर्वधर्मीयांना एकत्र घेऊन जावेच लागेल. एखाद्या समाजाला बाजूला ठेवून पुढे जाता येणार नाही. पंतप्रधान मोदी अलीकडे वारंवार एका धर्माच्या विरोधात भूमिका मांडत आहेत, अशी भूमिका मांडणाऱ्यांच्या बरोबर आम्ही कधीही जाणार नाही असेही शरद पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Raj Thackeray : जातीपातीचे राजकारण आणि धार्मिक धुमाकुळ घालण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची विरोधकांवर टीका

Murlidhar Mohol : पुणेकरांचे जीवनमान शाश्वत शैलीला अनुकुलतेसाठी आग्रही- मुरलीधर मोहोळ

Amol Kolhe | शिरूर मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेणार, अमोल कोल्हे यांची घोषणा