टाटा एअरबसनंतर आणखी एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर?

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून (Maharashtra) बाहेर जात आहेत. नुकताच टाटा एअरबस (Tata Airbus Project) हा प्रकल्प नागपुरातून गुजरातला गेला. त्यानंतर आता आणखी एक प्रकल्प नागपुरातून राज्याबाहेर जातोय.

टीव्ही 9 मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, सॅफ्रन ग्रुपचा प्रकल्प (Saffron Group Project) आता हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे. नागपूरच्या मिहानमधील हा प्रकल्प आहे. फ्रेंच कंपनी सॅफ्रन ग्रुपचा विमान आणि रॉकेट इंजिन बनवण्याचा हा प्रकल्प आहे. सॅफ्रन कंपनी मिहानमध्ये 1 हजार 185 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यार होती. मात्र आता हा प्रकल्प हैदराबादला जाणार असल्याची माहिती आहे.