महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Chandrashekhar Bawankule – महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदीच(Narendra Modi)  हवे आहेत. मात्र त्यांना हरविण्यासाठी २८ पक्ष एकत्र आले असले, तरी देखील १०० टक्के पसंती मोदी यांनाच मिळणार, बारामतीही आम्हीच जिंकू, असा ठाम विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, हाविकास आघाडीला जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार . कॉंग्रेसने केलेली पापं पंतप्रधान मोदी यांनी धुवून काढली आहेत.

बुधवारी प्रदेशाध्यक्षांनी मावळ लोकसभा मतदारसंघात प्रवास केला त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.  बावनकुळे म्हणाले, देश एकच असल्याने कोणत्याही राज्याचा कार्यक्रम इतर कोणत्याही राज्यात होऊ शकतो. त्यामुळे व्हायब्रंट गुजरात कार्यक्रम मुंबई होत आहे, त्यावर राजकारण करणे व कार्यक्रमांना गालबोट लावणे योग्य नाही, असेही ते म्हणाले. कॉंग्रेसचे आमदार तथा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राहूल गांधी यांना भाषण देता येत नाही तर ते नेते कसे, यावरून चिमटा काढत, त्याच्या विधानविषयी शंका उपस्थित केली.

या प्रवासात प्रदेशाध्यक्षांसोबत प्रदेश सरचिटणीस प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, आ. उमा खापरे, आ, महेश लांडगे, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी, आ. अश्विनी जगताप, विभागीय संघटन मंत्री मकरंद देशपांडे, अमर साबळे, राजेश पांडे, धैर्यशील पाटील, रायगड उत्तर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, चिंचवड जिल्हाध्यक्ष शंकर जगताप, वर्षा डहाळे, रवींद्र भेगडे, सदाशिव खाडे, संजय मांगोडेकर, विलास मंडिगेरी, दीपक बेहेरे, नितीन पाटील, प्रकाश बेनेदार, चारुशीला घरत, परेश ठाकूर, अरुणशेठ भगत, अजय पातोडे, अनिल भगत, दीपक बेहेरे, नामदेव ढाके, शीतल शिंदे, तुषार हिंगे, शैला मोडक, सुजाता पलांडे, काळूराम बारणे, चंद्रकांत नखाते, सदाशिव खाडे,(Sanjay (Bala) Bhegde, b. Uma Khapre, Aa, Mahesh Landge, Aa. Prashant Thakur, Mr. Mahesh Baldi, Mr. Ashwini Jagtap, Divisional Union Minister Makarand Deshpande, Amar Sable, Rajesh Pandey, Darishsheel Patil, Raigad North District President Avinash Koli, Chinchwad District President Shankar Jagtap, Varsha Dahale, Ravindra Bhegde, Sadashiv Khade, Sanjay Mangodekar, Vilas Mandigeri, Deepak Behere, Nitin Patil, Prakash Benedar, Charushila Gharat, Paresh Thakur, Arunsheth Bhagat, Ajay Patode, Anil Bhagat, Deepak Behere, Namdev Dhaka, Sheetal Shinde, Tushar Hinge, Shaila Modak, Sujata Palande, Kaluram Barne, Chandrakant Nakhate, Sadashiv Khade)  यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

• शिंदे-पवारांचे राजकारण विकासाचे

उद्धव ठाकरे यांच्या सेनेत लोकसभेपूर्वी केवळ चारच नेते दिसतील. शरद पवारांची राष्ट्रावादीही किंचित झाल्याशिवाय राहणार नाही. अजित पवार यांच्याच नेतृत्त्वात पुढील काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महाराष्ट्रात दिसेल, यासाठी ते दिवसरात्र मेहनत करीत आहेत. शिंदे आणि पवार दोघेही विकासाचे राजकारण करीत आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला क्रमांक एकचे राज्य करण्याकरिता प्रयत्न करीत असल्याने भाजपात मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहेत. महाविकास आघाडीला निवडणुकीत उमेदवार मिळणार नाही. सर्व २८८ मतदारसंघात भाजपा महायुतीच्या मागे ताकद उभी करेल.

• रायगड -पुण्यात मोदी-मोदी जयघोष

मावळ लोकसभा क्षेत्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत तसेच चिंचवड येथे मावळ, पिपंरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सुपर वॉरियर्सशी श्री बावनकुळे यांनी संवाद साधाला. मावळ लोकसभा क्षेत्रातील ६०० सुपर वॉरिर्यस मतदारसंघातील प्रत्येक घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदी यांच्यासाठी समर्थन मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले. सोबतच त्यांनी पनवेल व चिंचवड येथे घर चलो अभियानात सहभागी होत जनतेशी संवास साधला. पुढचा पंतप्रधान कोण? असा प्रश्न करताच सर्वांनी एकसुराने मोदी मोदी असा जयघोष केला. यासोबतच त्यांनी स्थानिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली व मान्यवर प्रतिष्ठित नागरिकांच्या स्नेह भेट घेतली, विविध विषयावर चर्चा करतानाच त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविषयी समर्थन मागितले.

https://www.youtube.com/watch?v=mTUf-zLP4QE

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन

Lok Sabha 2024 Elections : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा