IND vs AFG: बुमराहच्या सेलेब्रेशनचा मँचेस्टर युनायटेडने फोटो शेअर केला आणि एक मनोरंजक प्रतिक्रिया दिली

India vs Afghanistan World Cup 2023: भारताविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. वर्ल्ड कप 2023 च्या 9व्या मॅचमध्ये टीम इंडियाने 8 गडी राखून पराभव केला. भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) शानदार गोलंदाजी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. विकेट घेतल्यानंतर बुमराहने खास सेलिब्रेशन केले. बुमराहचा फोटो फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडने शेअर केला आहे. यावर चाहत्यांच्या रंजक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

बुमराहने इंग्लिश फुटबॉलपटू मार्कस रॅशफोर्डप्रमाणे (Marcus Rashford)  सेलिब्रेशन केले. विकेट घेतल्यानंतर त्याने कपाळाच्या बाजूला बोट ठेवले. त्याचा फोटो मँचेस्टर युनायटेडने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रॅशफोर्ड मँचेस्टर युनायटेडकडून खेळतो. फोटोमध्ये बुमराहसोबत रॅशफोर्डही दिसत आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जसह अनेक संघांनी या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांकडूनही रंजक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दिल्लीत खेळल्या गेलेल्या सामन्यात बुमराहने 10 षटकात 39 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या. त्याने इब्राहिम झद्रान, मोहम्मद नबी, नजीबुल्ला आणि रशीद खान यांच्या विकेट घेतल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 272 धावा केल्या. बुमराहसोबत हार्दिक पांड्यानेही दोन बळी घेतले. त्याने गुरबाज आणि अजमतुल्लाला बाद केले.

अफगाणिस्तानने दिलेले लक्ष्य भारताने अवघ्या 35 षटकांत पूर्ण केले. रोहित शर्माने शतक झळकावले. त्याने 84 चेंडूंचा सामना करत 131 धावा केल्या. रोहितने 16 चौकार आणि 5 षटकार मारले. विराट कोहलीने नाबाद 55 धावा केल्या. त्याने 6 चौकार मारले. इशान किशनने 47 धावांचे योगदान दिले.

https://www.youtube.com/watch?v=mTUf-zLP4QE

महत्वाच्या बातम्या-

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Navratri : राज्यातील दांडिया आयोजकांना प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका ठेवणे बंधनकारक

मुंबई भाजपकडून ‘वाघ नखांच्या निमित्ताने’ कार्यक्रमाचे आयोजन

Lok Sabha 2024 Elections : लोकसभा 2024 निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने घेतला आढावा