Tejinder Singh Tiwana | पाकिस्तान आणि कसाबला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेसचा जाहीर निषेध

Tejinder Singh Tiwana | पाकिस्तान समर्थक काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार (Vijay Vaddetiwar) यांनी दहशतवादी अजमल कसाबला केलेल्या समर्थनार्थ व देशभक्त वकील उज्ज्वल निकम यांना केलेला देशद्रोह वक्तव्याविरोधात जनता युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईच्या वतीने आज स्व.मीनाताई ठाकरे फुले मार्केट, कामगार मैदान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, दादर (प.) येथे काँग्रेस नेत्यांचे पाकिस्तान प्रेम आणि चुकीच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजयुमोचे मुंबई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनादरम्यान तेजिंदर सिंग तिवाना (Tejinder Singh Tiwana) म्हणाले की, नेहमीच दहशतवाद्यांच्या पाठीशी असलेली काँग्रेस आज दहशतवाद्यांना फासावर नेणारे देशभक्त उज्ज्वल निकम यांच्यावर खोटे आरोप करत आहे. देशभक्तांचा अपमान करणे आणि देशाच्या शत्रूंचा गौरव करणे हा काँग्रेस नेत्यांचा स्वभाव आहे. याआधी काँग्रेसच्या पंतप्रधानांची दहशतवादी यासिन मलिकशी मैत्री होती.काँग्रेसचे युवराज राहुल गांधी हे थोर क्रांतिकारक सावरकरजींचा अपमान करत आहेत आणि आता त्यांचा पाकिस्तान समर्थक गुंड नेता अजमल कसाबचे कौतुक करून देशभक्त वकील उज्ज्वल निकम यांना देशद्रोही म्हणत आहेत. प्रेमाची दुकाने उघडण्याचा दावा करणारे नेते एसडीपीआय सारख्या दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या संघटनांचा वायनाडमध्ये पाठिंबा घेत आहेत.या देशात राहूनही देशाचे नसलेल्या काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांचा धिक्कार आहे. अशा काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेत्यांना देशातील जनता या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय